Drug Case : आर्यन खानच्या कोठडीत वाढ, आणखी दहा दिवस तुरुंगात मुक्काम
Cruise Ship Drug Case : आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी दहा दिवसांची वाढ झाली आहे.
Cruise Ship Drug Case : आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत आणखी वाढ झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टानं आर्यन खानसह अन्य सात जणांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज आर्यनसह इतर आरोपींना सर्व व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. सुनावणीवेळी न्यायालयानं आर्यनची कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आर्यनचा आणखी दहा दिवस मुक्काम तुरुंगातच राहणार आहे. 14 दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या आर्यनला आणखी काही दिवस आर्थर रोडमध्ये राहावं लागणार आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज बुधवारी न्यायालयाने फेटाळला. या निर्णयाला आर्यनच्या वकिलांकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलं. यावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी होणार आहे.
#Breaking: Special NDPS Court extends judicial custody of #AryanKhan and seven others till October 30 in the cruise ship drug case. pic.twitter.com/kkD7vJUX36
— Live Law (@LiveLawIndia) October 21, 2021
आर्यनच्या वकिलांकडे 30 ॲाक्टोबर पर्यंतचा वेळ आहे. कारण त्यानंतर 12 दिवस कोर्टाला दिवाळीची सुटी असणार आहे. जर या 7 दिवसांत कोर्टात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होऊन कोर्टानं आपला निर्णय दिला नाही तर, आर्यन खानला दिवाळीमध्येही जेलमध्येच रहावे लागेल. कोर्टात एनसीबीने आर्यनचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीयाशी असल्याचा आरोप करत एनडीपीएस अॅक्टच्या कलम 29 अ अंतर्गत आर्यनच्या जामीनाला विरोध केला जो कोर्टाने मान्य केला. एनसीबीला आर्यन खानच्या विदेशी दुव्यांचा संशय आहे. आर्यन खानला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी अटक केली. एनसीबीला आर्यन खानकडून ड्रग्ज किंवा रोख रक्कम मिळाली नाही. कोर्टात एनसीबीने म्हटले होते की, आर्यन खान अरबाज मर्चंटकडे सापडलेल्या ड्रग्जचं सेवन करणार आहे. एनसीबी आर्यन खानचे ड्रग्ज चॅट, परदेशी लिंक्सचे पुरावे असल्याचा दावा करत आहे. एनसीबीने युक्तिवादात आर्यन खानच्या ड्रग्ज चॅटचा ही उल्लेख केला, ज्यात तो परदेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागताना दिसला होता. एनसीबीला आर्यनने ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा संशय आहे.
कसा राहीला संपूर्ण घटनाक्रम -
- 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड
- 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत
- 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड
- 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली
- आर्यनखानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं
- न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली
- 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला
- मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला
- 9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद
- 11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर
- एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश
- 12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही
- 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध
- समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
- आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
- 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला
- 15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू - कोर्ट
- 20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला
- 21 ऑक्टोबर - शाहरुख खान आथर रोड तुरुंगात आर्यनला भेटायला गेला.
- 21 ऑक्टोबर - आनन्या पांड्याच्या घरी एनसीबीची धाड, आनन्या पांड्याला समन्स