एक्स्प्लोर

Jiah Khan: जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

सूरजनं (Sooraj pancholi) जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्टानं आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातून अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) निर्दोष मुक्तता झाली आहे. सूरजनं या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर सूरजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'सत्याचा नेहमी विजय होतो.' या पोस्टमध्ये त्यानं ' हॅशटॅग गॉड इज ग्रेट' असंही लिहिलं आहे. सूरजच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जिया खानच्या आईनं सूरजवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता जिया खान मृत्यू प्रकरणातून सूरजची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सूरजची पोस्ट

Jiah Khan: जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...

सूरजची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर जिया खानची आई राबिया खाननं सांगितलं,'जिया खानला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप फेटाळण्यात आला. या प्रकरणाचा निकाल आज लागला. पण मग माझ्या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? हा प्रश्न निर्माण होतो. मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मी सुरुवातीपासून सांगितलं आहे की, हे प्रकरण हत्येचे आहे. आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत.'

3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील  तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली. जिया खानच्या घरात सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. 

सूरज पांचोलीनं या चित्रपटांमध्ये केलं काम

 सूरजनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.  टाइम टू डान्स, हवा सिंह या चित्रपटामध्ये देखील सूरजनं काम केलं. गुजारिश, एक था टायगर यांसारख्या चित्रपटांचा सूरज हा असिस्टंट डायरेक्टर होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Sooraj P (@soorajpancholi)

 जियानं वयाच्या 18 व्या वर्षी  राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.  हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Jiah Khan: टॉर्चर ते गर्भपात, जिया खाननं सुसाईड नोटमध्ये सूरज पांचोलीवर केले होते गंभीर आरोप; अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर 10 वर्षात काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?Milind Narvekar Special Report : Uddhav Thackeray यांचा शिलेदार मैदानात,मिलिंद नार्वेकर आमदार होणार?Ambadas Danve Suspension Special Report : शिवीगाळ, राजकारण ते निलंबन; दानवे-लाड प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget