Sonu Sood: आता फक्त माकडांना पकडायचं बाकी, हे पण करुन पाहतो; सोनू सूदची मदतीची तयारी
माकडांच्या उच्छादामुळे हैराण झालेल्या एका गावाने त्या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) कडे केली. त्यावर सोनू सूदने मजेदार उत्तर देत मदत करण्याची तयारी दाखवली आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोणाच्याही मदतीसाठी तत्पर असतो. कोरोना काळात त्याने ज्या प्रकारे सामान्यांची मदत केली ती कोणत्याही सरकारांही जमली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याकडे कोणीही मदत मागतात. आता उच्छाद मांडणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली आहे. सोनू सूदने त्याचीही तयारी दाखवली आहे.
ट्विटरवर उत्तर प्रदेशमधील जांस, सोहसा मठिया या क्षेत्रातल्या बासु गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने सोनू सूदला टॅग करताना सांगितलं की त्याच्या गावात माकडांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. आता या माकडांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना दूर कुठेतरी जंगलात नेवून सोडावे अशी मागणी त्या व्यक्तीने सोनू सूदकडे केली आणि त्याच्याकडून मदत मागितली. या ट्वीटसोबत एका स्थानिक वृत्तपत्रातील बातमीची दखल देण्यात आली आहे.
@SonuSood sir ???? हमारे गाँव में एक लंगूर बंदर के आतंक के कारण दर्जनो लोग घायल हो चुके है अतः आपसे निवेदन है की बंदर को हमारे गाँव से कही दूर जंगल में भेजवा दीजिए @GovindAgarwal_ ???? pic.twitter.com/pWHcZ9gcTG
— Basu Gupta (@BasuGup36643968) February 8, 2021
त्यावर सोनू सूदने मजेदार उत्तर दिले आहे. सोनू सूद याला रिप्लाय देताना म्हणाला की, "बास, आता माकडांना पकडायचं तेवढं राहीलं होतं मित्रा. पत्ता सांग, हे पण करुन पाहतो."
बस अब बंदर पकड़ना हो बाकी रह गया था दोस्त। पता भेज, यह भी करके देख लेते हैं। ???? https://t.co/9yPV50AOsl
— sonu sood (@SonuSood) February 8, 2021
Sonu Sood : सुप्रीम कोर्टात BMCच्या नोटिसीविरोधातील याचिका सोनू सूदनं घेतली परत
अभिनेता सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची मदत केली होती. त्याने दिल्ली, मुंबई आणि इतर शहरात फसलेल्या मजुरांची मदत केली होती. स्वत: च्या खर्चातून त्यांना त्यांच्या घरी पोहचवलं होतं. त्यानंतर सोनू सूदकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी मदत मागितली. कुणाचे ऑपरेशन असो वा काही अडचणी असो, सोनू सूदने काही ना काही प्रमाणात मदतीची मागणी करणाऱ्यांची मदत केली आहे. पण आता माकडांचा बंदोबस्त त्याला करावा लागेल असं स्वप्नातही वाटलं नसेल.
मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या कोपरगावातील गरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद याने प्रत्येकी दहा हजार रुपयांचे मोबाईल वाटले होते.
In Pics : शिक्षण थांबायला नको; सोनू सूदकडून कोपरगावात 100 विद्यार्थ्यांना स्मार्टफोनची भेट