(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतीय जवानांवर आधारीत म्युझिक व्हिडिओमध्ये सोनू सूद.. 'पागल नहीं होना' टॉप ट्रेंडमध्ये
सर्वसामान्यांसाठी संकटमोचक असलेला सोनू सूद पुन्हा एकदा ट्रेंडींगमध्ये आला आहे. पण, यावेळेचं कारण वेगळं आहे.सोनूचं नवीन गाणं 'पागल नहीं होना' हे सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.
बॉलिवूड अभिनेता आणि संकटात सर्वांना मदत करण्यासाठी प्रसिद्ध असलेला सोनू सूदने संगीत व्हिडिओद्वारे चंदेरी दुनियेत पदार्पण केले आहे. त्याच्यावर चित्रित केलेले गाणे 'पागल नहीं होना' प्रसिद्ध झाले आहे. हे रोमँटिक गाणं पंजाबी गायक सुनंदा शर्मा यांनी गायलेलं आहे. गाण्यात सोनू एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे, ज्याची प्रेयसी त्याची परत येण्याची वाट पहात असते. तो कधीच येणार नाही हे तिला कळल्यानंतरी ती वाट पाहणे सोडत नाही.
हे गाणे रिलीज होताच टॉप ट्रेंडमध्ये आलं आहे. हे यूट्यूबवर पहिल्या 3 क्रमांकावर ट्रेंडिंग आहे. सोनू सूद या गाण्यात काम करण्याबद्दल एका मुलाखतीत म्हणाला, होता की "हा माझा पहिला संगीत व्हिडिओ आहे, जेव्हा मला ही संकल्पना ऐकवण्यात आली तेव्हा मला ती खूप आवडली." पागल नहीं होना हे सर्व जवान आणि त्यांच्या प्रियजनांना समर्पित आहे, या शब्दांमुळे आपल्या मनाला स्पर्श होईल, सोबतच सुनंदानेही हे सुंदर गायले आहे.
त्याचवेळी, गायिका सुनंदा शर्मा म्हणाली, 'पागल नहीं होना हे माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. हे गाणं प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल. सोनू सर राष्ट्राचा नायक बनला आहे आणि तो ह्या गाण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यांच्याबरोबर काम करुन खूप चांगलं वाटलं'. हे गाणे अवी सारा यांनी संगीतबद्ध केले असून जानीने हे गीत लिहिले आहे.