एक्स्प्लोर

'ते' 12 रुपये देणाऱ्या युवकाची सोनू निगमशी भेट

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम वेश बदलून वृद्ध भिकाऱ्याच्या रुपात भीक मागत असल्याचा व्हिडिओ गेल्या आठवड्यात व्हायरल झाला होता. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे सोनूला खरंच एक वृद्ध समजून नाश्त्यासाठी एका तरुणाने 12 रुपये दिले होते. या तरुणाशी भेट घेण्याची इच्छा सोनूने व्यक्त केली होती. सोनूची इच्छा प्रत्यक्षात आली असून दोघांची अखेर भेट घडली आहे.   'बीईंग इंडियन'च्या 'रोडसाईड उस्ताद' या व्हिडीओत मुंबईच्या रस्त्यावर एक भिकारी हार्मोनियम वाजवून गाणं गाताना दिसला. त्याचं गाणं ऐकून तिथे एकच गर्दी झाली. लोक त्याच्या सुरेल आवाजाला आणि गाण्याला दाद देत होते. त्यानंतर तो भिकारी तिथून त्याचं सामान आवरुन उठला आणि निघाला.   भिकाऱ्याच्या वेशात गाणारा दुसरा-तिसरा कोणीही नसून प्रसिद्ध गायक सोनू निगम होता. त्याने 'कल हो ना हो' सिनेमातील हर घडी बदल रही है हे गाणं गायलं. गाणाऱ्या भिकाऱ्याचा सुरेल गळा ऐकण्यासाठी तिथे जमलेल्या कोणालाही त्याला ओळखता आलं नाही. यावेळी एका तरुणाने त्याच्याशी हात मिळवला आणि विचारलं, "अंकल आपने नाश्ता किया या नहीं?"   'बीईंग इंडियन' मंगळवारी पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोनू 'क्रेझी दिल मेरा' या आगामी गाण्यानिमित्त फेसबुकवरुन चाहत्यांशी लाईव्ह चॅट करत होता. हे चॅट सुरु असतानाच सोनूला 12 रुपये देणारा शहबाज अली सैयद त्याच्या घरी प्रवेश करतो आणि शिरताच सोनूला आलिंगन देतो. शहबाजशी भेट हे सोनूसाठी सरप्राईझ होतं, त्याचप्रमाणे शहबाजलाही आपण कोणाची भेट घेणार हे माहित नव्हतं.   'मला तुमच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. म्हणून तुम्ही गात बसलेल्या जागी मी पुन्हा गेलो. पण तोपर्यंत तुम्ही निघून गेला होतात. त्यानंतर जेव्हा व्हिडिओमध्ये तुम्ही माझं कौतुक केल्याचं मी ऐकलं, तेव्हा मला खूप गहिवरुन आलं. मी आयुष्य जगलोय, असं मला काही काळासाठी वाटलं' अशा भावना शहबाजने व्यक्त केल्या आहेत.   "हा अनुभव मी कधीही विसरणार नाही. ज्या तरुणाने नाश्त्याचं विचारलं होतं, त्याने मला हळूच 12 रुपये दिले होते. ही माझ्या आयुष्यातील अमूल्य कमाई आहे. हे 12 रुपये मी माझ्या ऑफिसमध्ये फ्रेम करुन लावणार आहे." असं सोनूने व्हिडिओच्या शेवटी सांगितलं होतं. त्यानुसार त्याने खरोखरच ते 12 रुपये फ्रेम करुन ठेवले आहेत. सोनूने ती फ्रेम दाखवताच शहबाजला भरुन आलं.   'ते 12 रुपये देताना आपण एक मोठं काम करतोय याची कल्पनाही नव्हती. मी तर फक्त एका उपाशी गायकाला खायला दिलं होतं. त्यामुळे याबाबत उल्लेखही कुठे केला नाही.' असं शहबाज म्हणाला. सोनूने शहबाजच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याच्या घरी आई आणि दोन बहिणी असतात. हा अनपेक्षित अनुभव सोनू आणि शहबाज या दोघांनाही सुखावून गेला आहे.

सोनू आणि चाहत्याच्या भेटीचा व्हिडिओ :

 

संबंधित बातम्या  :

 

VIDEO : मुंबईच्या रस्त्यावर भीक मागणारा हा गायक कोण?

 

पाहा सोनू निगमचं अनोखं रुप :

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget