एक्स्प्लोर

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले सुजलेल्या पायाचे फोटो! म्हणाली ‘आई होणं कधी कधी...’

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच ‘आई’ होणार आहे. सोनम सध्या तिच्या गर्भारपणाचा आनंद घेत आहे.

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) लवकरच ‘आई’ होणार आहे. सोनम सध्या तिच्या गर्भारपणाचा आनंद घेत आहे आणि ती अनेकदा तिच्या आई होण्याच्या या प्रवासाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते. मात्र, ज्याप्रकारे प्रत्येक महिलेला गरोदरपणात काही किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागते, त्याच पद्धतीने अभिनेत्रीलाही गरोदरपणात काही बदल जाणवत आहेत. आज अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर सुजलेल्या पायांचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोनम लवकरच आई होणार आहे. त्यांच्या कुटुंबात बाळाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सोनम सध्या सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉंट करताना दिसते. सोनमने नुकतीच लंडनमधील घरात ग्रँड बेबी शॉवर पार्टी ठेवली होती. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आता सोनमच्या सुजलेल्या पायांचा फोटो पाहून चाहते काळजीत पडले आहेत.

पाहा फोटो :

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले सुजलेल्या पायाचे फोटो! म्हणाली ‘आई होणं कधी कधी...’

सोनम कपूर तिच्या प्रेग्नेंसी पीरियडची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच सोनम कपूर अशाच काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सोनमने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रेग्नेंसीमुळे तिचे पाय कसे सुजले आहेत, हे दाखवताना दिसत आहे. सोनमचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आई होणं कधीकधी सोपं नसतं!

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेडवर पडली असून, तिच्या पायाचा फोटो काढताना दिसत आहे. सोनमने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कधीकधी आई होणं सोपं नसतं'.

सोनमनं मार्च 2022 मध्ये ती प्रेग्नंट असल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. त्यानंतर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या. सोनम बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.

सोनमचे आगामी चित्रपट

2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके'  हा चित्रपट रिलीज झाला होता. आता लवकरच ती ‘ब्लाइंड’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सोनमच्या ‘आयशा’, ‘सावरिया’, ‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget