एक्स्प्लोर

Sonali Kulkarni : 'भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत'; सोनाली कुलकर्णीच्या वक्तव्याचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

नुकताच सोनालीचा (Sonali Kulkarni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे.

Sonali Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनालीच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. आहे. नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. 

काय म्हणाली सोनाली?

अमित श्रीवास्तव नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनालीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सोनाली म्हणते, "भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी आपल्या दोघांसाठी काय करु शकते?"

पुढे सोनाली म्हणाली, "अशा मुली घडवा ज्या समान वागणूक देतात. जे स्वत:साठी कमावत असेल. जी असं म्हणू शकेल की, घरात नवा फ्रिज घ्यायचा असेल तर अर्धे पैसे मी देईन." सोनालीने समानता या विषयाबरोबरच इतर काही विषयांवर देखील भाष्य केलं आहे. 

पाहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांनी सोनालीचं केलं कौतुक


एका नेटकऱ्यानं सोनालीच्या व्हिडीओला कमेंट केली, 'खूप छान बोलली. पोटगीवरही बंदी घालणे ही काळाची गरज आहे. लोकोमोटिव्ह चालवण्यापासून ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रेजिमेंटच्या प्रमुख तुकडीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावत असतील तर घटस्फोटासाठी पोटगी का मागतात?' तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, 'ती खूप चांगलं बोलली आहे. मुलींवर योग्य संस्कार न करण्यासाठी मी पालकांना जबाबदार धरतो.'

सोनालीचे चित्रपट

देऊळ, सिंघम, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगा बाई अरेच्‍या 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये सोनालीने काम केलं.  काटा रुते कुणाला, तमन्ना, काली - एक अग्निपरीक्षा या मालिकांमध्ये देखील सोनालीनं काम केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget