एक्स्प्लोर
सोनाक्षी सिन्हाचा पुढील महिन्यात साखरपुडा?
मुंबई : बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा यंदा साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, सोनाक्षी पुढील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये बॉयफ्रेण्ड बंटी सजदेहसोबत साखरपुडा करण्याची तयारीत आहे. मात्र तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
सोनाक्षी सिन्हाने बंटी सजदेहची आयुष्याचा सोबती म्हणून निवड केली असून दोघे पुढील महिन्यात साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे.
सोनाक्षी सिन्हा बॉयफ्रेण्डसोबत लवकरच लग्नाच्या बेडीत?
सोनाक्षी आणि बंटी 2012 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या रिलेशनशिपची बॉलिवूडमध्ये चर्चा असते. तसंच बऱ्याच ठिकाणी दोघांना एकत्र पाहिलं आहे. पण सोनाक्षीचे वडील म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांना दोघांच्या नात्यावर फारसे खुश नाहीत, असंही म्हटलं जात आहे. याचं कारण बंटी सजदेह विवाहित असून तो सोनाक्षीपेक्षा वयाने फारच मोठा आहे. आता सोनाक्षी आणि बंटी खरंच साखरपुडा करणार आहेत की नाहीत हे फेब्रुवारी महिन्यातच स्पष्ट होईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
कोल्हापूर
राजकारण
शिक्षण
Advertisement