Siya : 'हमें न्याय चाहिए...'सिया'चे पोस्टर आऊट; मनीष मुंद्रा करणार दिग्दर्शनात पदार्पण
Siya : 'सिया' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Siya : 'सिया' (Siya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. विनीत कुमार सिंह आणि पूजा पांडे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष मुंद्रा सांभाळणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मनीष मुंद्रा (Manish Mundra) दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
16 सप्टेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित
'सिया' हा सिनेमा भारतावर आधारित असून या सिनेमात एका छोट्या खेडेगावातील एका मुलीचा कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली मुलगी अडचणींना तोंड देत न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेते आणि दुष्ट पुरुष वर्चस्व व्यवस्थेविरुद्ध चळवळ सुरू करते. दृष्यम फिल्म्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा सिनेमा 16 सप्टेंबर 2022 देशभरात प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
पूजा पांडे या सिनेमात सियाच्या भूमिकेत आहे. तर रंगबाजच्या भूमिकेत विनीत कुमार सिंह दिसणार आहे. 'सिया' सिनेमावर दिग्दर्शक मनीष मुंद्रा म्हणाला,"महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिया या सिनेमात घोर अमानुषतेचे चित्रण करण्याचा प्रयत्न आहे. जिथे शक्तीहीन, निष्पाप महिलांना अशा जगात ठेवले जाते जे लैंगिक निषिद्ध आणि तरीही महिलांकडे चुकीच्या नजरेने पाहतात".
'सिया' सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली पूजा पांडे म्हणाली,"एक महिला म्हणून मला ही कथा महत्त्वाची वाटली. ही कथा असंख्य पीडितांच्या भावनांना अनुसरून आहे. एक वेगळा विषय या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे". तर विनीत कुमार सिंह म्हणाला,"सिया' हा सिनेमा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा आहे".
संबंधित बातम्या