एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गायक मिका सिंग दुबईत पोलिसांच्या ताब्यात
पोलिसांनी मिकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. मिका सिंगला रविवारी कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
मुंबई : प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबईमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिकाने अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप 17 वर्षीय ब्राझिलीयन मॉडेलने केला आहे.
मिकाने आपल्याला अश्लील फोटो पाठवल्याचा दावा तक्रारदार अल्पवयीन तरुणीने केला आहे. या प्रकरणाची यूएईमधील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी मिकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. मिका सिंगला रविवारी कोर्टासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
मिका सिंग आणि वाद हे समीकरण नवीन नाही. मुंबईतील एका मॉडेलने 2016 मध्ये मिकावर विनयभंगाचा आरोप केला होता. मिकानेही तिच्याविरोधात खंडणीखोरीची तक्रार दाखल केली होती.
त्यापूर्वी मिकाने एका संगीत रजनीत डॉक्टरशी गैरव्यवहार केला होता. त्यावेळी मिकाला अटक झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्याआधी, परवानगीपेक्षा जास्त भारतीय आणि परकीय चलन बाळगल्याप्रकरणी मिकाला मुंबई विमानतळावर अटक झाली होती.
2006 मध्ये मिकाने त्याच्या बर्थडे पार्टीत जबरदस्तीने किस घेतल्याचा आरोप अभिनेत्री राखी सावंतने केला होता. मात्र काही वर्षांनी राखीने या वादावर पडदा टाकत दोघांमधील मतभेद मिटवले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
Advertisement