एक्स्प्लोर

युवा संगीतकार आणि गायिका अनुराधा पौडवाल यांचे पुत्र आदित्य यांचं निधन!

युवा संगीतकार आणि प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : युवा संगीतकार आणि प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवाल यांचं निधन झालं. ते अवघ्या 35 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. त्यातूनही आदित्य आपलं संगीताचं काम करत होतेच. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत कार्यरत असणाऱ्या आदित्य यांच्या निधनाच्या वृत्ताने संगीतक्षेत्राला धक्का बसला आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल आणि गायिका अनुराधा पौडवाल यांना आदित्य आणि कविता ही दोन मुलं. कविता गायनात प्रवीण आहे. तर आदित्यने मात्र आपल्या वडिलांचा वसा पुढे नेला. आदित्य कधीच चर्चेत नसायचा पण त्याचं काम मात्र चालू होतं. अनुराधा यांच्या अनेक अध्यात्मिक गाण्यांना आदित्यने स्वरसाज चढवला आहे. या गणपतीमध्ये त्याने अनुराधा पौडवाल यांच्यासोबत उमागणपती नावाचं सिंगल आणलं होतं. त्यातल्या त्याच्या वाद्यसंरचनेचं खूप कौतुकही झालं. काळापुढचा विचार त्यांच्या संगीतात होता.

आदित्य यांना मूत्रपिंडाचा विकार होता. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रातल्या मान्यवरांनीही हळहळ व्यक्त केली आहे. गायक शंकर महादेवन यांनाही या बातमीने धक्क बसला असून, केवळ दोन दिवसांपूर्वीच आपण त्याच्यासोबत गाणं रेकॉर्ड केल्याचं ते सांगतात. या बातमीने आपल्याला जबर धक्का बसल्याचंही त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

आदित्य आणि कविता ही दोन्ही नावं मराठी संगीतक्षेत्राला अपरिचित नाहीत. आदित्य सातत्याने छोटी छोटी गाणी करुन सोशल मीडियावर शेअर करत होते. त्याच्या फेसबुकवरच्या वॉलवर नजर टाकली तर अतिशय हळूवार, तरल मनाचे आदित्य होते. अरुण पौ़डवाल आणि अनुराधा यांनी मराठी संगीतविश्वाला दिलेल्या गाण्यांचे संदर्भ सातत्याने त्यांच्या वॉलवर दिसतात. आई-वडिलांचे जुने फोटो.. त्यावरच्या कॅप्शन्स लक्ष वेधून घेतात. त्यांच्या अचानक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget