Sidhu Mosse Wala : सिद्धू मूसेवाला जिंदा है! लेकाच्या नव्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहून वडील भारावले; म्हणाले,"तो आजही..."
Sidhu Mosse Wala : आजही सिद्धू चाहत्यांच्या मनात जिवंत असल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे.
Siddhu Mosse Wala : पंजाबचा लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचं 'मेरा ना' (Mera Na) हे गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धूचे चाहते त्याच्या नव्या गाण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर आज त्यांचं 'मेरा ना' (Siddhu Mosse Wala New Song Mera Na Out) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे. अल्पावधीतच हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून यावर सिद्दू मूसेवालाच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,"आजही सिद्धू चाहत्यांच्या मनात जिवंत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे".
एबीबीला दिलेल्या मुलाखतीत सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह म्हणाले,"सिद्धूच्या 'मेरा ना' या नव्या गाण्याने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सिद्धूच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की त्याच्या निधनानंतर आजही तो त्यांच्या मनात जिवंत आहे".
बलकौर सिंह पुढे म्हणाले की,"सिद्धूची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत राहणार आहेत. त्याची गाणी नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. सिद्धूच्या चाहत्यांवर माझा विश्वास आहे. त्याला न्याय मिळावा यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. सिद्धूला न्याय देण्याऐवजी सरकार जर गॅंगस्टारला पाठिंबा देत असेल तर पंजाबीत गाणं देशभरात पोहोचवणाऱ्या सिद्धूची काय चूक... खरा देशप्रेमी कोण?".
सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये कायम
सिद्दू मूसेवाला यांचं 'मेरा ना' (Mera Na) हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अल्पावधीतच मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं ग्रॅमी पुरस्कार विजेते नाइजीरियन रॅपरने गायलं आहे. या गाण्यावर चाहते कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सिद्धू कायम जिवंत राहणार, ब्रो तुमची आठवण येत आहे, अशा कमेट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
सिद्धू मूसेवाला यांचे वडील रॅपरच्या अरदासच्या दरम्यान म्हणाले होते की, ते कायम गाण्यांच्या माध्यमातून सिद्धूला जिवंत ठेवणार आहेत. तसेच दर 5-6 महिन्यांनी ते सिद्धूचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धीची सर्व गाणी पुढल्या 5-7 वर्षात रिलीज होणार आहेत आणि या गाण्यांच्या माध्यमातून सिद्धू चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील.
संबंधित बातम्या