Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवाला यांनी गायलेल्या लोकप्रिय गाण्यांची यादी
Sidhu Moosewala : पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.
Sidhu Moosewala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे. सिद्धू मुसेवाला यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. 'सो हाई' (So High) या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला प्रचंड लोकप्रिय झाले. जाणून घ्या सिद्धू मुसेवाला यांनी गायलेली लोकप्रिय गाणी...
सो हाई (So High) : 'सो हाई' हे गाणं 2017 साली रिलीज झाले होते. या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हे गाणं सिद्धू मुसेवाला यांनी लिहिलेले असून त्यांनीच गायले आहे. या गाण्याला यूट्यूबवर 480 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
सेम बीफ (Same Beef) : 'सेम बीफ' हे गाणं सिद्धू मुसेवाला यांनी रॅपर बोहेमियासोबत गायले आहे. या गाण्याला यूट्यूबवर 394 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
टोचन (Tochan) : 'टोचन' हे गाणं सिद्धू मुसेवाला यांनी लिहिले आणि गायले आहे. तर हे गाणं बाइग बर्ड यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला यूट्यूबवर 252 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
जस्ट लिसन (Just Listen) : 'जस्ट लिसन' हे गाणं 2018 साली रिलीज झाले होते. सिद्धू मुसेवाला यांनीच हे गाणं लिहिलेले आणि गायलेदेखील आहे. या गाण्याला यूट्यूबवर 144 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
बंबिहा बोले (Bambiha Bole) : बंबिहा बोले हे गाणं 12 जून 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ग्लोबल यूट्यूब म्युझिक चार्टवर या गाण्याने पहिल्या पाचमध्ये प्रवेश केला होता. तर यूट्यूबवर या गाण्याला 155 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
डॉलर (Dollar) : डॉलर हे गाणं 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'डाकुआं दा मुंडा' या पंजाबी सिनेमातील आहे. या गाण्याला यूट्यूबवर 130 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
धक्का (Dhakka) : धक्का हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. सिद्धू मुसेवाला आणि पंजाबी गायिका अफसाना खान यांनी हे गाणं गायले आहे. या गाण्याला यूट्यूबवर 144 मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.
संबंधित बातम्या