एक्स्प्लोर

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांची हजेरी; फोटो व्हायरल

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीच्या वेडिंग रिसेप्शनला परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती.

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding Reception : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर त्यांनी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींसह परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. 

'शेरशाह'मध्ये विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत झळकलेला सिद्धार्थ 

सिद्धार्थ-कियाराच्या मुंबईत पार पडलेल्या रिसेप्शनला कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली होती. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विक्रम बत्रा यांचा जुळा भाऊदेखील वेडिंग रिसेप्शनला उपस्थित होता. सिद्धार्थचा 'शेरशाह' (Shershaah) हा सिनेमा कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात सिडने कॅप्टन बत्रा यांची भूमिका साकारली होती. तर कियाराने या सिनेमात कॅप्टन बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची म्हणजेच डिंपल चिमाची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ-कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 'शेरशाह' सिनेमातील सिद्धार्थ-कियाराच्या अभिनयासह त्यांची जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 

View this post on Instagram
 
A post shared by 🌸 Sidharth Malhotra FC 🌸 (@sidharth.malhotra.fc)

कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन विक्रम आणि डिंपल कॉलेजमध्ये असताना एकमेकांना डेट करत होते. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कारगिल युद्धात कॅप्टन बत्रा शहीद झाले. 

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी

सिड-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. यात सुपरस्टार अजय देवगण, काजोल, आलिया भट्ट, अनुपम खेर, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत सिंह, विक्की कौशल, दिशा पटानी, करीना कपूर, शिल्पा शेट्टी आणि नीतू सिंह या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

वेडिंग रिसेप्शननंतर कियारा आडवाणी ट्रोल

वेडिंग रिसेप्शननंतर कियारा आडवाणी नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. वेडिंग रिसेप्शनला कियाराने एक स्टायलिश ड्रेस परिधान केला होता. पण तिने मंगळसूत्र न घातल्याने तसेच कुंकू न लावल्याने नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे. 'हे वेडिंग रिसेप्शन नसून अॅवॉर्ड शो आहे असं दिसतंय', 'कियाराने मर्यादा ओलांडल्या', अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Genelia D'Souza: 'हा ड्रेस आणि हेअर स्टाईल...'; सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Embed widget