![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sidharth Malhotra : सिद्धार्थच्या 'योद्धा' चित्रपटाची घोषणा; करण जोहरकडून धमाकेदार व्हिडीओ शेअर
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) त्याच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
Sidharth Malhotra First Look As Yodha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) त्याच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सिद्धार्थच्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नुकतीच चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) सिद्धार्थच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मोशन पोस्टर करणने शेअर केला आहे.
'योद्धा' मध्ये सिद्धार्थची प्रमुख भूमिका
करण जोहरने शेअर केलेल्या योद्धा या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थ हटके लूकमध्ये दिसत आहेत. हा पोस्टर शेअर करून करणने कॅप्शनमध्ये लिहीले, 'धर्मा प्रॉडक्शनच्या पहिल्या अॅक्शन फ्रँचायझीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका दमदार शैलीत दिसणार आहे. योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा हे करणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.' करणने शेअर केलेल्या या मोशन पोस्टरमधील सिद्धार्थच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
View this post on Instagram
'स्टुडंट ऑफ द ईयर' या चित्रपटामधून सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या एक व्हिलन, बार बार देखो, जबरिया जोडी आणि कपूर अँड सन्स या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेरशाह या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली होती. चित्रपटात अभिनेत्री कियारा अडणवाणीने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. सध्या कियारा आणि सिद्धार्थच्या अफेअरबद्दल सोशलल मीडियावर चर्चा सुरू आहे.
Netflix Website : Netflix प्रेमींसाठी खुशखबर! लोकप्रिय सिनेमे आणि वेब सीरिजसाठी नवी वेबसाइट लॉन्च
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)