एक्स्प्लोर

Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं 'Jeena Zaroori Hai' रिलीज; चाहते भावूक

Sidharth Shukla : सिद्धार्थ शुक्लाचं 'जिना जरुरी हैं' हे शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Sidharth Shukla : छोटा पडदा गाजवलेला आणि बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता सिद्धार्थ शुक्लाचं शेवटचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'जिना जरुरी हैं' ( Jeena Zaroori Hai) असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणं ऐकून सिद्धार्थचे चाहते भावूक झाले आहेत. 

'जिना जरुरी हैं' या गाण्यात सिद्धार्थसोबत अभिनेत्री दीपिका त्रिपाठीदेखील (Deepika Tripathi) दिसून येत आहे. तसेच बिग बॉस स्पर्धक विशाल कोटियानदेखील (Vishal Kotian) दिसत आहे. विशाल कोटियान 'जिना जरुरी हैं' या गाण्यात सिद्धार्थच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. या गाण्यात एक लव्ह स्टोरी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

सिद्धार्थचे 'जिना जरुरी हैं' हे गाणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे शूटिंग ओडिसामध्ये झालं आहे. एका मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या दोन भावांची गोष्ट 'जिना जरुरी हैं' या गाण्यात दाखवण्यात आली आहे. हे गाणं रिलीज झाल्यापासून या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गाणं रिलीज झाल्याच्या काही तासांतच गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

गाण्यात सिद्धार्थच्या फोटोला हार घालत असतानाचा शॉर्ट घेण्यात आला आहे. हा शॉर्ट पाहून चाहते आणखीनच भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर हे गाणं चांगलचं व्हायरल होत आहे. एका सीनमध्ये भिंतीवर लटकलेल्या सिद्धार्थच्या फोटोकडे पाहून दीपिका ढसाढसा रडताना दिसत आहे. 

'जिना जरुरी हैं' या सिद्धार्थच्या शेवटच्या गाण्याने काही चाहते भावूक झाले आहेत. तर काहींना हे गाणं आवडलेलं नाही. या गाण्याच्या माध्यमातून सिद्धार्थचे चाहते पुन्हा एकदा सिद्धार्थच्या आठवणीत रमले आहेत. 'बिग बॉस 15'मध्ये विशाल म्हणाला होता, "मी जेव्हा बिग बॉसमधून बाहेर पडेन तेव्हा हे गाणं रिलीज होईल". 

बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. छोट्या पडद्यावरील बालिका वधू, दिलसे दिल तक या मालिकांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. 

संबंधित बातम्या

Sidharth Shukla च्या निधनानंतर Shehnaaz Gill ची पहिली पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष

Sidnaaz Adhura Song : अधुरा गाण्याचा पहिला लूक समोर, श्रेया घोषालकडून पोस्टर शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
Mrutyuchakra Upcoming Movie: एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?
एक घड्याळ… एक अदृश्य सावली… आणि मृत्यूचं गूढ; अंगावर शहारे आणणाऱ्या 'मृत्यूचक्र' सिनेमाचं मोशन पोस्टर पाहिलं?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget