Siddhanth Kapoor : बंगळुरुमधील ड्रग्स पार्टीमध्ये मित्रांसोबत दिसला सिद्धांत कपूर; व्हिडीओ व्हायरल
Siddhanth Kapoor Drugs Party Video : शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Siddhanth Kapoor Rave Party Video : बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर (Shakti Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला (Siddanth Kapoor) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत असून त्याने ड्रग्सचे सेवन केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ड्रग्स पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धांत मित्रांसोबत फिरताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सिद्धांत डीजे लावून डान्स करताना दिसत आहे. पार्टीत सिद्धांत खूपच आनंदी दिसत आहे. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. पंचतारांकित हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतला आता ताब्यात घेतलं आहे.
View this post on Instagram
सिध्दांत कपूरने 'शूटआउट अॅट वडाला', 'चेहरे', अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये सिद्धांतनं काम केले आहे. त्याने 'भूल भुलैया', 'चुप चुप के', 'ढोल', 'भागम भाग' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका सिद्धांतनं साकारली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 2020मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं श्रद्धा कपूरची चौकशी केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 2020 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं श्रद्धा कपूरची चौकशी केली होती.
संबंधित बातम्या