एक्स्प्लोर
'रईस'विरोधात सेना आक्रमक, सिनेमा प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा
कल्याण : अभिनेता शाहरुख खानच्या 'रईस' सिनेमाच्या प्रदर्शनाला पुन्हा एकदा विरोध सुरु झाला आहे. कल्याण पूर्वेतील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस आणि मल्टीप्लेक्सला चित्रपट प्रदर्षित न करण्याबाबत निवेदन दिलं आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यास सेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. 'रईस'मधील पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानला विरोध म्हणून सेनेनं हे आंदोलन केलं.
'रईस' येत्या 25 जानेवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याच्या प्रदर्शनाला विरोध सुरु झाला आहे. यापूर्वी शाहरुखने सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
आता शिवसेनेने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेने खरंच 'रईस'चं प्रदर्शन रोखणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement