Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शेहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?
टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शहजादा (Shehzada) या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
![Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शेहजादा’ चा ट्रेलर पाहिलात? Shehzada Trailer OUT Kartik Aaryan Kriti Sanon Movie Shehzada Trailer Video Shehzada Trailer OUT : अॅक्शन, ड्रामा अन् कॉमेडी; कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननच्या ‘शेहजादा’ चा ट्रेलर पाहिलात?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/740a4a75d215787013e71eb2c29f2d791673514979120259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shehzada Trailer OUT : अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) ‘शेहजादा’ (Shehzada) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिकचा स्वॅग आणि क्रिती सेननचा (kriti sanon) ग्लॅमरस अंदाज दिसत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवरुन शेहजादा या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.
"फैमिली पर आए तो डिसकशन नहीं करते हैं एक्शन करते हैं." हा डायलॉग शेहजादा चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला ऐकायला येतो. क्रिती सेनन आणि क्रिती सेनन यांच्यासोबतच या चित्रपटात परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अल्लू अर्जुनच्या ‘अला वैंकुठपुरमलो’ या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे, असंही म्हटलं जात आहे. रोहित धवननं शेहजादा या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पाहा ट्रेलर:
कार्तिकनं केली प्रार्थना
शेहजादा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी कार्तिकनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. फोटोमध्ये कार्तिक हा देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. या फोटोला कार्तिकनं कॅप्शन दिलं, 'गणपती बाप्पा मोरया, शेहजादा ट्रेलर आज रिलीज होतोय.'
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी शेहजादा या चित्रपटाच्या ट्रेलरची तुलना अला वैंकुठपुरमलो या चित्रपटाबरोबर केली आहे. 2020 मध्ये अल्लू अर्जुनचा 'अला वैंकुठपुरमलो' हा चित्रपट रिलीज झाला होता.आता अल्लू अर्जुनच्या 'अला वैंकुठपुरमलो' चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का ? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Shehzada Teaser: कार्तिक आणि क्रितीच्या 'शेहजादा' चा टीझर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'कॉपी...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)