एक्स्प्लोर

Sharmishtha Raut :  शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई ललित प्रभाकरला का दिली? अभिनेत्रीने सांगितला भावनिक प्रसंग

Sharmishtha Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिची पहिली कमाई ललित प्रभाकरला दिली आहे. याबाबत तिने एक भावनिक प्रसंग सांगितला आहे. 

Sharmishtha Raut :  अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) ही नाच गं घुमा या सिनेमाच्या माध्यमातून निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शर्मिष्ठाने आतापर्यंत अभिनेत्री म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अनेकदा अभियन क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना, कलाकार मंडळींना त्यांची पहिली कमाई ही कायम लक्षात राहते. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने देखील तिच्या पहिल्या कमाईबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतकचं नाही तर तिने तिची ही पहिली कमाई तशीच जपून ठेवली होती. पण तिने आता ती अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याला दिली आहे.

शर्मिष्ठा राऊत आणि ललित प्रभाकर यांनी झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत बहिण भावाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून शर्मिष्ठा ही खऱ्या आयुष्यातही ललितची मोठी बहिण झाली. या दोन्ही बहिण-भावांचं नातं आजही कायम आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सणही दोघं साजरे करत असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. इककचं नव्हे तर शर्मिष्ठाने तिची पहिली कमाई देखील ललितला दिली आहे. याबबात शर्मिष्ठाने नुकतच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

शर्मिष्ठाची पहिली कमाई

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही आता निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात वावरते. आता तू निर्माती झाली आहेस, त्यामुळे तू आता सगळ्यांचे पेमेंट देतेस, पण तुझा पहिला पगार किती होता? असा प्रश्न शर्मिष्ठाला विचारण्यात आला. त्यावर शर्मिष्ठाने म्हटलं की, मी जेव्हा ज्युनियर आर्टिस्ट होते, तेव्हा मला 500 लोकांच्या घोळक्यात असताना 250 रुपये मिळायचे. ते पाकिट मी मागच्या एक-दीड वर्षांपासून जपून ठेवलं होतं. पण ते आता माझ्याकडे नाही, कारण ते मी माझ्या भावड्याला म्हणजेच ललित प्रभाकरला दिलं. 

आणि मी ते पाकिट भावड्याला दिलं - शर्मिष्ठा राऊत

हा अनुभव शेअर करताना शर्मिष्ठाने पुढे म्हटलं की, ललितने आनंदी गोपाळ नावाचा सिनेमा केला. तो पाहिल्यानंतर मी फार भारावून गेले होते. तेव्हा मी त्याला म्हटलं की, यापेक्षा अजून चांगले रोल तू करशीलही, पण हे जे काही केलंय ते खूप भारीये. तेव्हा मी त्याला म्हटलं की मोठी बहिण म्हणून मला बक्षिस द्यायचं आहे. त्याने मला म्हटलं की काय, तेव्हा ते पाकिट मी त्याला दिलं. मी ते पाकिट आणलं आणि त्याला म्हटलं की, ही माझी पहिली कमाई आहे, त्यावर शर्मिष्ठा राऊत कंसात ज्युनियर आर्टिस्ट असं लिहिलं आहे. मी त्याला म्हटलं की, ही माझी पहिली कमाई आहे आणि मी जितकी जपून ठेवली तितकीच तूही जपून ठेवशील अशी खात्री आहे मला. 

ही बातमी वाचा : 

Bollywood Actor : बालपण चाळीत अन् इंजिनिअरची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, संपत्तीत पत्नीचा वरचष्मा; ओळखलं का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Embed widget