एक्स्प्लोर
Advertisement
करिनाचं बाळ मुंबईतच जन्मणार, सासूबाईंनी ठणकावलं
मुंबई : बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान यांच्या बाळाची चाहूल खान कुटुंबासोबतच त्यांच्या चाहत्यांनाही लागली आहे. एकीकडे करिना आणि सैफ लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, मात्र आपलं नातवंड मुंबईतच जन्मणार असल्याचं करिनाच्या सासूबाई, प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी ठणकावून सांगितलं आहे.
आमचं कुटुंब मुंबईत राहतं, मुंबईत काम करतं. मुंबईत घर असताना परदेशात जाऊन बाळंतपण करण्याचा मूर्खपणा कोण का करेल. त्यामुळे करिनाचं बाळंतपण परदेशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शर्मिला टागोर यांनी सांगितलं.
करिनाच्या प्रेग्नन्सीबाबत शर्मिला यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. पुन्हा एकदा आजी होण्याचा आनंद अवर्णनीय आहे. खान कुटुंबासोबत आपण जल्लोषात आनंद साजरा करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. डिसेंबरमध्ये करिनाच्या घरी नवा पाहुणा येण्याचा अंदाज आहे.
गर्भ लिंग परीक्षणाच्या आरोपांबाबत सैफ अली खान म्हणतो...
करिना आणि सैफने लपून छपून गर्भलिंग परीक्षण केल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. त्यावर 'आम्हाला अद्यापही आमच्या होणाऱ्या बाळाचं लिंग माहित नाही.' असं सैफने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. लंडनमध्ये बाळाला जन्म देण्याचा सैफ आणि करिनाचा इरादा असल्याचंही म्हटलं जात होतं, मात्र हा दावाही सैफने धुडकावून लावला होता. काही महिन्यांपूर्वी बाळाच्या लिंगाबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर करिनाही भडकली होती. जुलै महिन्यात सैफने आपण पिता होणार असल्याची घोषणा केली होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion