Ashneer Grover Father Died: 'शार्क टँक इंडिया' फेम अश्नीर गोव्हर यांना पितृशोक; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती
Ashneer Grover Father Died : 'शार्क टॅंक इंडिया'च्या पहिल्या पर्वाचे परीक्षक अश्नीर ग्रोव्हर यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.
Ashneer Grover Father Death : 'शार्क टॅंक इंडिया' (Shark Tank India) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांना पितृशोक झाला आहे. 'भारत पे' अॅपचे सह-संस्थापक असलेल्या अश्नीर गोव्हर यांचे वडील अशोक ग्रोव्हर (Ashok Grover) यांचे निधन झाले आहे. अश्नीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे.
अश्नीर गोव्हर यांची सोशल मीडियावर भावुक पोस्ट
अश्नीर गोव्हर यांनी सोशल मीडियावर वडिलांचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"गुडबाय बाबा... खूप खूप प्रेम... आता स्वर्गात जाऊन पापाजी, मोठी आई आणि आजी-आजोबांची काळजी घ्या". अश्नीर यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत श्रद्धांजली वाहिली आहे.
View this post on Instagram
28 मार्च 2023 रोजी अश्नीर गोव्हर यांच्या वडिलांनी वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. अश्नीर यांच्या वडिलांचे निधन नक्की कशामुळे झाले हे अद्याप समोर आलेलं नाही. अश्नीर गोव्हर यांच्या पोस्टवर आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत अशा सांत्वनपर कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अशोक ग्रोव्हर हे दिल्लीत चार्टर्ड आकाउंटंट म्हणून काम करायचे. अश्नीर यांच्यासाठी त्यांचे वडील खूपच खास होते. आता वडिलांच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
'शार्क टॅंक इंडिया'च्या पहिल्या पर्वाचं परीक्षण अश्नीर गोव्हर यांनी केलं होतं. 'शार्क टॅंक इंडिया'च्या पहिल्या पर्वामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. विनोदबुद्धी आणि स्पष्टवक्तेपणामुळे अश्नीर लोकप्रिय झाले. त्यांचे अनेक धमाल मीम्सदेखील व्हायरल झाले आहेत.
अश्नीर गोव्हर कोण आहेत? (Who Is Ashneer Grover)
अश्नीर हे फिनटेक फर्म भारतपेचे सह-संस्थापक आणि एमडी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली आणि आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले आहे. अश्नीर यांची एकूण संपत्ती 700 कोटी आहे. अश्नीर हे त्यांच्या लग्झरी लाईफास्टाईल चर्चेत असतात. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्यांने IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.
संबंधित बातम्या