Ashneer Grover: 'जब तक है ग्रोव्हर, इट्स नॉट ओव्हर'; अश्नीर ग्रोव्हर नव्या भूमिकेत, शेअर केला व्हिडीओ
नुकतात अश्नीर (Ashneer Grover) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.

Ashneer Grover: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) हे आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. नुकतात अश्नीर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले.
अश्नीर ग्रोव्हर हे शार्क टँकच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार नाहीत. आता अश्नीर हे पिचर्स-2 या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अश्नीर यांनी त्यांच्या आगामी सीरिजचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जब तक है ग्रोव्हर, इट्स नॉट ओव्हर. पाहा टीव्ही एफ पिचर्स 23 डिसेंबरला.' या व्हिडीओमध्ये अश्नीर हे त्यांचा 'भाई क्या कर रहा है तू?' हा डायलॉग म्हणताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Jab tak hai Grover, it’s not over !
— Ashneer Grover (@Ashneer_Grover) December 19, 2022
Watch new season of ‘TVF Pitchers’ from 23 Dec on @ZEE5India @TheViralFever #PitchersOnZee5 https://t.co/NOmdpuw9tx
अश्नीर हे त्यांच्या लग्झरी लाईफास्टाईल चर्चेत असतात. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी IIT दिल्लीमधून सिविल इंजिनियरिंगमध्ये B-Tech ही डिग्री मिळवली आहे. तसेच त्यांने IIM अहमदाबाद मधून MBA केले आहे.
कुठे पाहता येणार सीरिज?
पिचर्स-2 ही वेब सीरिज प्रेक्षक झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकणार आहेत. पिचर्स या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये चार मित्र हे त्यांची नोकरी सोडून स्वत:ची कंपनी सुरु करतात. आता या सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये हे चार मित्र त्यांच्या कंपनीच्या ग्रोथकडे लक्ष देताना दिसणार आहेत.
पिचर्स ही सीरिज सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 ला प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या सीरिज प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 23 डिसेंबर रोजी पिचर्स-2 सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पिचर्स-2 मध्ये नवीन कस्तुरिया, अरुणाभ कुमार, अभय महाजन, अभिषेक बॅनर्जी, रिद्धी डोगरा, सिकंदर खेर, गोपाल दत्त आणि आशिष विद्यार्थी यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. आता या सीरिजमध्ये अश्नीर ग्रोव्हर यांना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Pitchers-2 चा ट्रेलर प्रदर्शित; नवीन कस्तुरिया अन् अभिषेक बॅनर्जी प्रमुख भूमिकेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
