एक्स्प्लोर

म्हणून शाहरुखने 'वीर-झारा'सह 5 सिनेमातून ऐश्वर्याला काढलं!

शाहरुखने ऐश्वर्याला डच्चू दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चलते चलते'.

मुंबई : 'मोहब्बते' चित्रपटातील आर्यन आणि मेघाची जोडी असो, वा 'देवदास'मधले देव आणि पारो... अगदी 'जोश' सिनेमातले मॅक्स आणि शर्ली ही भावंडंसुद्धा... बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या जोडीचे असंख्य चाहते आहेत. 2000 च्या आसपास शाहरुख-अॅशला एकत्र पाहण्याची फॅन्सची इच्छा होती, मात्र शाहरुखने तसं होऊ दिलं नाही. निर्माते शाहरुख-ऐश्वर्याला एकत्र साईन करण्याची धडपड करत होते. अगदी 'शक्ति' चित्रपटात 'इष्क कमिना' आयटम साँगमध्येही दोघांना एकत्र आणण्यात आलं. मात्र खुद्द शाहरुखनेच पाच बॉलिवूडपटांमधून ऐश्वर्याचा पत्ता कट केला. त्याचं कारणही इंटरेस्टिंग आहे. शाहरुखने ऐश्वर्याला डच्चू दिलेला पहिला चित्रपट म्हणजे 2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'चलते चलते'. ऐश्वर्याला काढून तिच्याऐवजी राणी मुखर्जीची वर्णी लावण्यात आली. 'इंडिया टुडे'तील एका जुन्या रिपोर्टनुसार याच चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सलमान खानने राडा केला होता. ऐश्वर्या आणि सलमान त्यावेळी रिलेशनशीपमध्ये होते, मात्र दोघांमध्ये कुरबुरी सुरु होत्या. मद्यपान करुन सलमान 'चलते चलते'च्या सेटवर आला आणि त्याने धिंगाणा घातला. त्यामुळे शाहरुखने ऐश्वर्याची उचलबांगडी केली. 'आम्ही एकत्र सिनेमे करणार होतो, मात्र अचानक ते माझ्या हातातून गेले. पण मला त्याचं कारण माहित नाही' असं ऐश्वर्याने एका जुन्या मुलाखतीत म्हटलं होतं. ऐश्वर्याच्या हातातून निसटलेला दुसरा बिग बजेट चित्रपट म्हणजे यश चोप्रा यांचा 'वीर झारा'. तगडी स्टारकास्ट, सुंदर लोकेशन्स, आणि यश चोप्रा यांच्या कारकीर्दीतला अखेरचा चित्रपट. शाहरुखसोबत या सिनेमात प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत झळकली, मात्र हा रोल आधी ऐश्वर्याला ऑफर झाला होता. 'एखाद्या कलाकारासोबत नवीन प्रोजेक्ट सुरु करायचा आणि त्यानंतर त्याचा कोणताही दोष नसताना त्याला काढून टाकायचं हे चूक आहे. ऐश्वर्या माझी चांगली मैत्रिण आहे. वैयक्तिकरित्या मी खूप चुकीचं वागलो. पण निर्माता म्हणून माझा निर्णय योग्यच वाटतो. मी तिची माफी मागतो' असं शाहरुख म्हणाला होता. ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मैत्रीत कधीच वितुष्ट आलं नाही. म्हणजेच ऐश्वर्याने शाहरुखचा निर्णय समजूतदारपणे घेतला, असंच दिसतं. 2014 मध्ये शाहरुख आणि फराह खान यांनी ऐश्वर्याला 'हॅपी न्यू इयर' ऑफर केला, मात्र तिने तो नाकारला. अर्थात 'ऐ दिल है मुश्किल'च्या निमित्ताने दोघं एकत्र आले.

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget