एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बर्थ डे स्पेशल : किंग खानच्या 50 रंजक गोष्टी
शाहरुख खान लहानपणापासून जरी सिनेमावेडा असला तरी त्याची खरी आवड वेगळी होती. त्याला सैन्यात जायचं होतं. लहानपणापासून त्याने जपलेलं स्वप्न फौजी आणि जब तक है जान सिनेमातून त्याने काही प्रमाणात पूर्ण केलं.
मुंबई : ब़ॉलिवूडचा बादशाहा अर्थात अभिनेता शाहरुखचा आज 53 वा वाढदिवस. हिंदी सिनेसृष्टीतल्या या एव्हरग्रीन रोमँटिक हिरोकडे पाहता त्याच्या वयाचा अंदाज लावणं तसं कठीणच. टीव्हीपासून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या एसआरकेबाबत माहित असलेल्या-नसलेल्या 50 ठळक गोष्टी.
- शाहरुख खानचं मूळ नाव होतं अब्दुल रहमान. त्याच्या आजीने हे नाव त्याला दिलं होतं, पण त्याच्या वडिलांना हे नाव आवडलं नाही आणि म्हणूनच त्यांनी अब्दुल रहमान हे नाव बदलून शाहरुख खान नाव दिलं. शाहरुखचा अर्थ आहे फेस ऑफ किंग..अर्थात सम्राटाचा चेहरा…हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत आपली बादशाही प्रस्थापित करत शाहरुखने वडिलांनी दिलेलं हे नाव सार्थ ठरवलं.
- शाहरुख जेव्हा 4 वर्षांचा होता तेव्हा तो खुप खोड्या करायचा. एकदा त्याने शेजाऱ्यांच्या घरावर दगड मारले. रात्री तो शेजारी भरपूर दारू पिऊन शाहरुखच्या घरी जाब विचारायला आला. शाहरुख घाबरला. त्या शेजाऱ्याकडे हत्यारदेखील होतं. वडिलांनी शाहरुखला बाहेर बोलवलं आणि त्याने खरंच दगड मारले का ते विचारलं. शाहरुखने चुक कबुल केली. तेव्हा त्याच्या वडिलांनी शाहरुखला बाहेर जायला सांगितलं आणि त्या शेजाऱ्याची माफी मागायला सांगितली. करावं तसं भरावं हेच शाहरुखला शिकवण्याचा प्रयत्न त्याच्या वडिलांनी केला.
- शाहरुख शाळेत असताना त्याचा सगळ्यात नावडता विषय होता हिंदी. अभ्यासाच्या नावाने बोंबाबोंब असल्यानं तो हिंदी विषयात नेहमी नापास व्हायचा. त्याच्या आईने यावर एक नामी युक्ती शोधली. परीक्षेच्या आधी ती शाहरुखला एक आमीष दाखवायची…सिनेमाचं आमीष… जर शाहरुख चांगल्या मार्कांनी हिंदी विषयात पास झाला तर सिनेमा पाहायला घेऊन जायचं ते आमीष होतं. युक्ती कामी आली आणि शाहरुखला हिंदी विषयातही चांगले मार्क्स मिळू लागले. थोडक्यात सिनेमाच्या दुनियेत शाहरुख
- शाहरुख खान लहानपणापासून जरी सिनेमावेडा असला तरी त्याची खरी आवड वेगळी होती. त्याला सैन्यात जायचं होतं. लहानपणापासून त्याने जपलेलं स्वप्न फौजी आणि जब तक है जान सिनेमातून त्याने काही प्रमाणात पूर्ण केलं.
- याच सिनेमाच्या प्रेमामुळे त्याने मास कम्युनिकेशनचा कोर्स करण्याचं ठरवलं. दिल्लीच्या Jamia Milia University मध्ये त्याने मास कम्युनिकेशनसाठी अॅडमिशन घेतलं.
- शाळेत आणि कॉलेजमध्ये शाहरुख अष्टपैलू विद्यार्थी होता. अभ्यासाव्यतीरीक्त इतर गोष्टींतही तो रस घ्यायचा आणि म्हणूनच त्याला दहावीत असताना रामन सुब्रमन्यम पुरस्कार देण्यात आला तर बारावीत असताना अत्य़ंत मानाचा स्वॉर्ड अॉफ ऑनर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
- शाहरुखचे वडिल दिल्लीच्या नॅशनल स्कुल अॉफ ड्रामामध्ये कॅँटीन चालवायचे. त्यांच्यासोबत शाहरुखही कँटीनमध्ये जायचा त्यावेळी रोहिणी हट्टंगडी, राजेश विवेक, सुरेखा सिक्री, राज बब्बर, अजीत वच्छानी असे अभिनय क्षेत्रातले दिग्गज एनएसडीमध्ये होते. शाहरुख दिवसातला बराचसा वेळ त्यांच्यासोबत घालवत असे.
- शाहरुख जेव्हा 15 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं. ते उत्तम हॉकीपटू होते. शाहरुखने हॉकीमध्ये नाव कमवावं अशी त्यांची इच्छा होती.
- शाहरुखचं अभिनयाच्या इंड्स्ट्रीत येण्याला एक अपघात कारणीभूत ठरला. फुटबॉलची मॅच सुरु असताना त्याला दुखापत झाली आणि त्याचं खेळणं बंद झालं. दरम्यान कॉलेजमधल्याच एका नाटकासाठी त्याला विचारणा झाली. त्या नाटकात 10 मुलं आणि 80 मुली होत्या. आणि पूर्ण नाटकात शाहरुखच्या तोंडी फक्त एक वाक्य होतं. ते एक वाक्य किंग खानच्या अभिनयाच्या कारकिर्दीची नांदी ठरलं.
- आज कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या शाहरुखची त्याच्या आयुष्यातली पहिली कमाई होती केवळ 50 रुपये. स्ट्रगलिंगच्या काळात दिल्लीमध्ेय गायक पंकज उधास यांच्या कॉन्सर्टमध्ये काम करण्यासाठी त्याला 50 रुपये पगार मिळायचा.
- शाहरुखने सर्वात आधी लेख टंडन यांच्या दिल दरिया या टीव्ही सीरिजमध्ये काम केलं होतं. पण प्रॉडक्शन कामाच्या दिरगांईमुळे त्याची दुसरी मालिका फौजी त्याआधी टेलिकास्ट झाली. त्यामुळेच फौजी शाहरुखची डेब्यू मालिका ठरली. असंच काही शाहरुखच्या फिल्मी करिअरबाबतीतही घडलं
- दिवाना हा शाहरुख खानचा पहिला सिनेमा मानला जातो पण गंमत म्हणजे दिवाना सिनेमा साईन करायच्याही आधी शाहरुखने एक सिनेमा केला होता. त्या सिनेमाचं नाव होतं दिल आशना है. हेमा मालिनीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण या सिनेमाच्या रिलीजमध्ये अनेक अडथळे आल्याने दिवाना सिनेमा आधी रिलीज झाला. म्हणजे दिल आशना है हा त्याचा पहिला सिनेमा असुनही तांत्रिकदृ्ष्ट्या दिवानाची शाहरुखचा पहिला सिनेमा म्हणून नोंद झाली.
- फौजी आणि सर्कस या मालिकांचं शूटिंग सुरु असताना हेमा मालिनी आणि हॅरी बावेजा त्याला सतत फोन करायचे. अर्थातच त्यांच्या सिनेमात त्याने रोल करावा म्हणून. पण शाहरुख त्यांना नेहमीच नम्रपणे नकार द्यायचा कारण त्याला कधी अभिनेता बनायचंच नव्हतं. पण सुदैवाने त्याने हा विचार बदलला..नाहीतर किंग ऑफ रोमान्सच्या अदाकारीला 70 एमएमवर पाहण्यासाठी आपण प्रेक्षक मुकलो असतो.
- शाहरुखला एक मोठी बहिण आहे - शहनाज.वडिलांच्या निधनानंतर शहनाजला धक्का बसला. शहनाज शाहरुखच्या फॅमिलीसोबतच मुंबईत राहाते. शहनाज फारशी कॅमेरासमोर येत नाही. पण या भाऊ बहिणीचं नातं खूप सुंदर आहे. शहनाजसोबत शाहरुख त्याच्या भावना शेअर करतो.
- शाहरुख आणि गौरीच्या लग्नाचेही अनेक गमतीदार किस्से आहेत. शाहरुख जेव्हा गौरीच्या प्रेमात पडला तेव्हा गौरी केवळ 14 वर्षांची होती आणि शाहरुख होता 18 वर्षांचा. कोवळ्या वयातलं हे प्रेम शाहरुख आणि गौरीने आजही तितक्याच घट्टपणे जपलंय.
- 1994 साली शाहरुखचा कभी हा कभी ना हा सिनेमा रिलीज झाला. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण हा सिनेमा चालावा म्हणून शाहरुख स्वत: तिकीट खिडकीवर बसून तिकिटं विकत होता. या सिनेमासाठी त्याला त्यावेळी 25 हजार रुपये मानधन म्हणून मिळाले होते.
- शाहरुख त्याचा मित्र विवेक वासवानीसोबत यश चोप्रा यांचा लम्हे हा सिनेमा थिएटरमध्ये पाहात होता. त्याचवेळी सिनेमा सुरु असताना तिथे त्याचा सेक्रेटरी पोहोचला आणि त्याने यशजींना तुला सिनेमात कास्ट करण्याची इच्छा असल्याचं शाहरुखला सांगितलं. यशजींचं नाव ऐकताच सिनेमा मध्येच सोडून शाहरुख यश चोप्रांना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि यशजींनी शाहरुखला डर सिनेमासाठी साइन केलं. या सिनेमातला शाहरुखचा अंदाज आणि क क किरण हा डायलॉग आजही त्याची ओळख आहे.
- शाहरुख खान म्हणजे चाहत्यांच्या हृदयातला हिरो… मात्र हाच हिरो अनेक सिनेमात व्हिलन बनूनही झळकला. डर, बाजीगर, अंजाम, डुप्लिकेट, डॉन आणि डॉन 2 हे ते सिनेमे आहेत ज्यात शाहरुख खान खतरनाक खान बनून आपल्यासमोर आला.
- बॉलिवूडमध्ये एखादा तरी सिनेमा मिळावा म्हणून 5-5 वर्षं स्ट्रगल करणारे लोक हजारोंच्या संख्येने सापडतील. पण शाहरुखचं नशिब एवढं थोर होतं की त्याने एकाच दिवसात 5 सिनेमे साइन केले होते.
- राहुल या नावाशी शाहरुखचं काहीतरी पुर्वाजन्मीचं नातं असावं. कारण तब्बल 22 सिनेमात त्याच्या कॅरॅक्टरचं नाव होतं राहुल. - नाम तो सुना ही होगा...
- किंग खानला आपण कॅमिओ किंग असंही म्हणू शकतो कारण आत्तापर्यंत जवळ जवळ 26 सिनेमात त्याने कॅमिओ रोल केलेले आहेत.
- मोठ्या पडद्यावरचा हा सुपरस्टार छोट्या पडद्यावर मात्र सुपरफ्लॉप ठरला. फौजी आणि सर्कस या त्याच्या सुरुवातीच्या मालिका सोडल्या तर कौन बनेगा करोडपती, क्या आप पांचवी पाससे तेज है आणि जोरका झटका सारखे रिअॅलिटी शोज त्याला झटका देणारे ठरले.
- आईस्क्रिम अजिबात आवडत नाही असा माणूस आख्ख्या पृथ्वीतलावर एखादा दुसराच असेल…त्यातलाच एक माणूस म्हणजे शाहरुख. तुम्ही विश्वास नाही ठेवणार पण शाहरुख खानला आईसक्रीम अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही…
- कोणाला पाण्याचा फोबिया असतो, कुणाला उंचीचा फोबिया असतो तर कुणाला वेगाचा फोबिया असतो. किंग खानला फोबिया आहे तो घोडेस्वारीचा. बाजीगर, अशोका या काही फिल्म्समध्ये सीनची गरज म्हणून शाहरुखने घोडेस्वारी केली आहे पण घोडेस्वारी करणं ही त्याच्यासाठी आयुष्यातली सगळ्यात शेवटची गोष्ट आहे असं त्याचं म्हणणं आहे.
- शाहरुख नेसल ड्रॉपशिवाय घरातून कधीच बाहेर निघत नाही. बऱ्याच लोकांना यामुळे तो ड्रग अॅडिक्ट आहे असं वाटतं असं तो सांगतो. एकदा शाहरुख अमेरिकेतल्या डिस्को मध्ये गेला होता. तिथे सगळे ड्रग्ज घेत होते. शाहरुखच्या खिशात नेसल ड्रॉप होते..ते पाहून तिथल्या लोकांना हे काहीतरी वेगळं आहे असं वाटलं. शाहरुखने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की ते नेजल ड्रॉप्स आहेत. पण कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. शाहरुख खानने स्वत: सांगितलेला हा किस्सा आहे.
- शाहरुखच्या इतर अनेक सवयींपैकी एक गमतीदार सवय म्हणजे तो रोज रात्री झोपताना छान इस्त्री केलेला पजामा घालून झोपतो. आणि जेव्हा जेव्हा यामागचं कारण त्याला विचारलं जातं तेव्हा त्याचं उत्तर असतं की कोण कधी स्वप्नात भेटेल सांगता येत नाही ना… म्हणून मी झोपताना देखील अगदी निटनेटकेपणाने तयारी करुन झोपतो… अगदी फिल्मी उत्तर आहे ना …?
- शाहरुखला असं वाटतं की तो चांगला स्वीमर नाही, आणि म्हणूनच इतरांसमोर पोहणं त्याला आवडत नाही. बहुधा यामुळेच शक्यतो सिनेमातही तो असा सीन देणं टाळतो. (बाजीगर - किताबे बहुत सी गाण्यामधला सॉन्ग सीक्वेन्स वापरु शकतो )
- शाहरुख खानचा अंकशास्त्रावर खुप विश्वास आहे आणि त्यानुसार 555 आणि 40 हे दोन नंबर त्याच्यासाठी लकी नंबर्स आहेत असं तो मानतो. त्यामुळे त्याच्या मोबाईल नंबरपासून ते ऑफिस नंबरपर्यंत सगळीकडे 555 आणि 40 दोन नंबरचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. .
- शाहरुखकडे महागड्या आणि अँटिक कार्सचा अक्षरश: खजिना आहे. त्यात 1 कोटी 90 लाखांची ऑडी ए 6, 2 कोटी रुपयांची लँड क्रुजर, बेंटले कंपनीची कॉन्टिनेंटल जीटी जिची किंमत अंदाजे साडेचार कोटी रुपये इतकी आहे. एवढंच नव्हे तर अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी रोल्स रॉईस ही अलिशान कारही शाहरुखच्या पदरी आहे.
- शाहरुख जेवढा कार्सच्या प्रेमात आहे तेवढाच तो टू व्हीलर्सचाही फॅन आहे. दिलवालेच्या सेटवर नुकतीच एक बाईक रोहित शेट्टीने त्याला गिफ्ट दिली. हार्ले डेविड्सनची ही सुपरबाईक अंदाजे 15 लाखांची आहे. या गाडीचा नंबरही शाहरुखचा लकी 555 हाच आहे.
- शाहरुख त्याची वेडिंग रिंग डाव्या हातात नाही तर उजव्या हातात घालतो. फिल्म डॉनच्या सेटवर शूटिंग दरम्यान शाहरुखची ही वेडिंग रिंग हातातून निसटली होती, सारे क्रू मेंबर शूटिंग सोडून शाहरुखची वेडिंग रिंग शोधण्यासाठी धडपडत होते. अखेर सगळ्या क्रू मेंबर्सनी शाहरुखची वेडिंग रिंग शोधून दिली.
- शाहरुख स्वत:ला बेस्ट अॅक्टरपेक्षाही आदर्श पित्याच्या भूमिकेत जास्त पसंत करतो. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून तो नेहमीच प्रयत्न करतो. त्याच्या मन्नत या घरात नमाज इतक्याच मनोभावे गणपतीची आरतीही केली जाते.
- शाहरुखचा मन्नत हा बंगला म्हणजे साऱ्यांसाठीच आकर्षणाचा बिंदू आहे. एखाद्या राजवाड्यासारखा असलेल्या या बंगल्याची किंमत जवळपास 2000 कोटी रुपये आहे. हजारोंच्या संख्येंने मुंबईत येणारे शाहरुखचे चाहते मन्नतसमोर दररोज गर्दी करतात. शाहरुखची केवळ एक झलक दिसावी ही मन्नत मागणारे चाहते मन्नतसमोर रांत्रदिवस उभे असतात.
- शाहरुख खानचं आवडतं सुट्टीचं ठिकाण आहे दुबई. तो प्रत्येक वर्षी फॅमिलीसह दुबईला जातो. दुबईतल्या सगळ्यात महागड्या आणि प्रतिष्ठेच्या पाम जुमेराह इथं त्याचा अलिशान महाल आहे. ज्याची अंदाजे किंमत 65 मिलीयन डॉलर्स इतकी प्रचंड आहे.
- शाहरुखला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल जर तुम्हाला सांगितलं तर एेकुन तुम्हाला जोरदार धक्का बसू शकतो. कारण वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात शाहरुखला 226 वेळा नामांकनं मिळालीत. त्यापैकी 207 वेळा त्याने पुरस्कार पटकावलेत. ज्यामध्ये तब्बल 27 वेळा त्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
- भारतीय फिल्म सृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारावर सर्वाधिक वेळा म्हणजे आठ वेळा शाहरुखने सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून नाव नोंदवलंय. याआधी हा विक्रम दिलीपकुमार यांच्या नावावर होता. माय नेम इज खानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळवून शाहरुखने दिलीपसाहेबांच्या विक्रमाशी बरोबरी केलीये.
- शाहरुखची लोकप्रियता केवळ भारतात नाही तर भारता बाहेरही आहे. सिंगापूरमध्ये आर्किड फुलांच्या एका स्पिसीजला Ascocenda Shah Rukh Khan असं नाव देऊन शाहरुखचा गौरव करण्यात आला.
- 2008ला न्यूजवीकने जाहिर केलेल्या 50 मोस्ट पावरफुल लोकांच्या यादीत शाहरुखचं नाव 41व्या स्थानावर आहे. या यादीतला तो एकमेव मुव्ही स्टार आहे. त्याच्याविषयी लिहिल्या गेलेल्या लेखात असं लिहिण्यात आलंय की, जगातला बिगेस्ट मुव्ही स्टार कोण आहे? ब्रॅड पिट, विल? नाही. त्याचं नाव आहे शाहरुख खान आणि तो बॉलिवूडचा किंग आहे.
- वेल्थ एक्स या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार शाहरुख खानकडे आज तब्बल 3752 कोटी रुपयांची संपत्ती आहे. संपूर्ण जगभरातल्या अतीश्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हॉलिवूडचा जगप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रुझ या यादित तिसऱ्या स्थानावर आहे.
- लग्नसमारंभामध्ये सेलिब्रेटिजना बोलवण्याची सध्या वेड आहे आणि हे वेड दिवसेंदिवस वाढतेच आहे. अनेक बड्या आसामींच्या लग्न समारंभात आपण शाहरुखला पाहिलंही आहे. पण सामान्यांच्या हे आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. कारण एखाद्या समारंभात केवळ 15 मिनिटांच्या हजेरीसाठी शाहरुख खान तब्बल 2.50 कोटी रुपये घेतो. काय मग बोलवताय का शाहरुखला ?
- चेन्नई एक्सप्रेस सिनेमातला एक सीन आहे. प्रचंड मोठ्या धबधब्यावर उभारलेला एक ब्रीज आणि त्या ब्रीजवरुन येणारी ट्रेन. ट्रेन येते आणि अगदी ब्रिजच्या मध्यावर उभी रहाते. गोव्यातल्या दुधसागर धबधब्यावर हा सीन जेव्हा अॅक्चुअली शूट केला होता. तेव्हाची परिस्थिती अशी होती (vis)म्हणजे पाणी अगदीच कमी होतं आणि डोंगरावरची हिरवळही लक्षात न येण्यासारखी. पण हा सीन जेव्हा सिनेमात दिसला तेव्हा त्याचं रुप पूर्णपणे पालटलं होतं. ही जादू होती शाहरुख खानची मालकी असलेल्या रेड चिलीज या व्हिएफएक्स स्टुडिओची. हॉलिवूडच्या तोडीचा व्हिएफएक्स स्टुडिओ भारतात बनवणं हे शाहरुखचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न रेड चिलीच्या रुपात त्याने पूर्ण केलं.
- शंभर कोटींचा टप्पा पार करत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी कोटींची मजले सर केलेत. पण प्रत्येक कलाकाराच्या प्रत्येक फिल्मने चांगलाच बिझनेस केलाय असं मात्र नाही. पण शाहरुख याबाबतीत सुद्धा लकी ठरलाय. दिवाना पासून हॅपी न्यू इयरपर्यंत त्याच्या प्रत्येक फिल्मच्या कलेक्शनचा विचार केला तर आजवरच्या त्याच्या फिल्म्सचं अॅवरेज कलेक्शन राहिलंय 34 कोटी.
- ओरीसातल्या अतीदुर्गम भागातली सात खेडी शाहरुखला आयुष्यभर विसरणार नाहीत. कारण शाहरुखच्या आर्थिक सहाय्यामुळे या सात गावांमधला अंधार कायमचा मिटलाय. अहिरजपूर, बानीपाल, ओकीलपाल, पालाचुआ, रांगानी, देन्लासाही आणि गुप्ती ही ती सात खेडी आहेत. जिथं शाहरुख खानच्या मदतीने सौर्यउर्जेचे प्लॅँट्स बसवले आहेत.
- मुलांच्या शिक्षणासाठी शाहरुखने केलेल्या कामाबद्दल त्याचा युनोस्कोनेही गौरव केलाय. 'पिरॅमिड कॉन मार्नी' हा युनोस्कोचा अंत्यत मानाचा समजला जाणारा सन्मान पटकवणारा शाहरुख खान हा पहिला भारतीय आहे.
- चंद्रारालाही डाग आहेत असा शब्दप्रयोग आपण सर्रास एेकतो. चंद्राचे ते डाग म्हणजे चंद्रावर असलेले विवर म्हणजेच खड्डे आहेत हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. गंमत म्हणजे शाहरुख खानचं या चंद्रावरच्या खड्ड्यांशीही नातं आहे. आणि ते नातं म्हणजे चंद्रावरच्या एका विवराला शाहरुख खानचं नाव देण्यात आलय. बॉलिवूडच्या या सम्राटाने थेट चंद्रावर स्वारी केलीय असंच म्हणता येईल. (A Crater on the Moon has been named after SRK,)
- लंडनच्या मादाम तुसा वॅक्स म्युझियमबद्दल आपण नेहमीच एेकतो. अनेक सेलिब्रेटिजचे मेणाने बनवलले पुतळे तिथं आहेत पण शाहरुख पुतळा मादाम तुसा म्युझियमबरोबरच पॅरीसमधल्या ग्रेवीन म्युझियममध्येही ठेवण्यात आलाय. शाहरुखच्या आधी तिथे फक्त महात्मा गांधींचा पुतळा होता. थोडक्यात हा सन्मान मिळवणारा शाहरुख खान महात्मा गांधींनंतरचा दुसरा भारतीय आहे.
- 'जेव्हा जेव्हा माझ्यातला अहंकार जागा होतो किंवा मी सुपरस्टार असल्याचा मला भास व्हायला लागतो तेव्हा मी अमेरीकेला जातो कारण तिथं गेल्यावर तिथल्या विमानतळावरच माझ्यातल्या सुपरस्टारच्या चिंध्या केल्या जातात. माझ्यातल्या अहंकाराचं हवेत उडालेलं विमान तिथले विमानतळावरचे सुरक्षाअधिकारी जमीनीवर अाणतात' असं शाहरुख म्हणतो हे मत शाहरुखने उपहासाने जरी व्यक्त केलं असलं तरी त्यात बऱ्याचअंशी तथ्य आहे. कारण अमेरीकेत शाहरुखला कधीही सन्मानाची वागणूक दिली गेली नाही. तिथल्या विमानतळावर त्याची 4-4 तास कसून चौकशी केली जाते. याला माझं आडनाव कारणीभूत आहे असं शाहरुख सांगतो.
- 66व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये शाहरुखला स्लमडॉग मिलेनियर हा सिनेमा प्रेझेंट करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. याआधी एकाही भारतीय कलाकाराला हा सन्मान मिळाला नव्हता. या पुरस्कार सोहळ्यातही शाहरुखच्या एण्ट्रीला किंग ऑफ बॉलिवूड म्हणून शाहरुखचं स्वागत केलं गेलं.
- शाहरुखला नुकतंच एडिनबर्ग विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. प्रिन्सेस रॉयल यांच्या हस्ते ही मानाची पदवी शाहरुखला दिली गेली. यातला महत्वाचा भाग हा की ही पदवी मिळवणारा शाहरुख खान हा दुसरा भारतीय आहे. याआधी भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम यांना एडिनबर्ग विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली होती.
- कोणत्याही सुपरस्टारला त्या पदांपर्यंत पोहोचवतात ते त्याचे फॅन्स. शाहरुखला जगभरातल्या त्याच्या चाहत्यांकडून अपार प्रेम मिळालंय..याच प्रेमाची परतफेड किंग खान त्याच्या पन्नासाव्या वाढदिवशी करतोय. फॅन या त्याच्या अपकमिंग सिनेमाचा ट्रेलर रिलीज करुन शाहरुख त्याच्या फॅन्सना रिटर्न गिफ्ट देतोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement