एक्स्प्लोर
शाहरुखचं इरफान आणि युसूफ पठाणला साकडं!

गांधीनगर : वडोदरा स्थानकावरील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या फरीद खान यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती अभिनेता शाहरुख खाननं इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांना केली आहे. शाहरुखला भेटण्यासाठी क्रिकेटपटू इरफान खान आणि यूसुफ पठाण वडोदरा स्टेशनवर आले होते. "फरीदखान यांच्या मृत्यूच्या बातमीने मी दु:खी आहे. बडोद्यात असलेल्या क्रिकेटर इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांना फरीदखान पठाण यांच्या कुटुंबीयांना आवश्यक सर्व ती मदत करण्याची विनंती मी केली आहे." असं शाहरुख खाननं म्हटलं आहे. तसंच या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'रईस' शाहरुखसाठी गर्दी, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी 'रईस' सिनेमाच्या प्रमोशनसाठी रेल्वेनं प्रवास करताना वडोदरा स्थानकात चेंगराचेंगरी झाली. चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत फरीद खान या स्थानिक सपा नेत्याचा मृत्यू झाला. फरीद खान यांच्या कुटुंबाला आणि जखमींना मदत करण्याची विनंती शाहरुखनं केली आहे. https://twitter.com/abpmajhatv/status/823762103521710080 अभिनेता शाहरुख खान मुंबईहून दिल्लीला आपल्या रईस या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी चालला होता. रात्री 10.30 च्या सुमारास ही ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस वडोदरा स्थानकात दाखल झाली. मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांनी रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी केली होती. रेल्वेच्या टपावर चढूनही चाहत्यांनी रेल्वे रोखून धरली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होवून चेंगराचेंगरी झाली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























