एक्स्प्लोर
शाहरुख आणि रणबीर कपूर हॉलिवूडच्या VIY सीरीज मध्ये दिसणार?

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि रणबीर कपूर लवकरच हॉलिवूड सीरीज VIY : JOURNEY TO INDIA मध्ये दिसण्याची शक्यता आहे. रशियन सिनेनिर्माता अॅलेक्सी पेत्रुहीननं या दोघा कलाकारांना आपल्या आगामी सीरीजसाठी प्रस्ताव दिला आहे. शाहरुख खानला मुख्य भूमिकेसाठी विचारण्यात आलं आहे. तसंच त्याला सहनिर्माता होण्यासाठीही विचारणा करण्यात आली आहे. "शाहरुख खानला सीरीजच्या मुख्य भूमिकेसाठी आणि सहनिर्माता होण्यासाठी आम्ही प्रस्ताव समोर ठेवला आहे. अजून शाहरुखकडून कोणतंही उत्तर मिळालं नसलं तरीही आम्ही शाहरुखच्या उत्तराची वाट पाहात आहोत. सोबतच रणबीर कपूरलाही आम्ही या सीरीजसाठी विचारलं आहे. शाहरुख खान आणि रणबीर कपूरला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत." असं अॅलेक्सी पेत्रुहीननं स्पष्ट केलं आहे. बॉलिवूडच्या कलाकारांनी गेल्या काही दिवसांत भारताबाहेरच्या सीरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. यात दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांनी हॉलिवूड सिनेमामध्ये काम केलं आहे. तसंच इरफान खाननंही काही हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता शाहरुख आणि रणबीरही हॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
Before You Go
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















