Ishaan Khatter: शाहिदच्या पत्नीनं ईशान खट्टरच्या लगावली कानशिलात; व्हिडीओ व्हायरल
शाहिदची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) , शाहिद आणि ईशान यांनी एक मजेशीर व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी दिल चाहता है या चित्रपटातील आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे.
Shahid Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि त्याचा भाऊ अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter) हे सोशल मीडियावर त्यांचे मजेशीर व्हिडीओ नेहमी शेअर करतात. सोशल मीडियावर दोघांमधील बॉन्डिंग पाहायला मिळते. शाहिदची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) , शाहिद आणि ईशान यांनी एक मजेशीर व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी फरहान अख्तरच्या दिल चाहता है या चित्रपटातील आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे.
व्हिडीओमध्ये ईशान आणि मीरा हे संवाद साधताना दिसत आहेत. त्यानंतर शाहिद हा ईशानला म्हणतो, 'अरे मर्द बन. अरे उसने तेरी मर्दानगी को ललकारा है, दिखा उसे'. जेव्हा ईशान मीराकडे जातो तेव्हा मीरा त्याच्या कानशिलात लगावते. हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत शाहिद कपूरने 'दिल क्या चाहता है' असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
शाहिदनं शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री क्रिती सेनननं देखील या व्हिडीओला कमेंट केली आहे. शाहिद कपूर लवकरच अली अब्बास जफर दिग्दर्शित ब्लडी डॅडी या चित्रपटात दिसणार आहे. तर ईशान खट्टरचा कॉमेडी-हॉरर चित्रपट फोन भूत काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात ईशानने कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन शेअर केली होती.
शाहिदच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची नेहमी पसंती मिळते. त्याच्या 'जर्सी', कबीर सिंह, पद्मावत, जब वी मेट यांसारख्या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहिद आपल्या अभिनयानं आणि नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. शाहिद आणि मीरानं 2015मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना जॅन आणि मीशा ही दोन मुलं आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: