मोठी बातमी! शाहरुख खान 'मन्नत' बंगला सोडणार, 24 लाख रेंट मोजून अपार्टमेंटमध्ये राहण्याची वेळ; कारण काय?
Shah Rukh Khan Mannat House : शाहरुख खान त्याचा मन्नत हा बंगला सोडणार आहे. तो 24 लाख रुपये प्रतिमहिन्याला देऊन रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहणार आहे.

Shah Rukh Khan Mannat House : शाहरुख खान हा असा अभिनेता आहे, ज्याला आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून तो बॉलिवुडवर राज्य करतोय. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आजही सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी होते. शाहरुख खानचे कपडे, त्याने वापरलेले घड्याळ, वापरलेले बुट हा देशभरात चर्चेचा विषय ठरतो. शाहरुखचा मन्नत हा बंगला तर देशभरात चर्चेचा विषय ठरतो. या घरापुढे फक्त एक फोटो काढण्यासाठी शेकडो लोक रोज मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करतात. दरम्यान, आता शाहरुख खानला त्याचा हाच मन्नत बंगला सोडावा लागणार आहे. आपली पत्नी आणि मुलांसह 24 लाख रुपयांच्या रेंटेड अपार्टमेंटमध्ये शाहरुखा राहावे लागणार आहे.
शाहरुख मन्नत सोडणार?
शाहरुख खानचा मन्नत हा बंगला नेहमीच चर्चेचा विषय असतो. गेल्या साधारण 25 वर्षांपासून तो या घरात राहतोय. शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही उत्कृष्ट इंटेरियर डिझायनर आहे. तिनेच या घराला सजवलेले आहे. दरम्यान, आता शाहरुख खान लवकरच शिफ्ट होणार आहे, असे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो लवकरच एका चार मजली अपार्टमेंटमध्ये राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी घ्यावी लागणार परवानगी
एचटीच्या रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम चालू होणार आहे. या दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या घराची दुरुस्ती करायची असेल तर शाहरुख खानला कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. शाहरुखचा मन्नत बंगला हा ग्रेड-3 हेरिटेज स्ट्रक्चर आहे. त्यामुळे या घरात काहीही बदल करायचा असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागते. या घराचे काम आगामी काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळेच शाहरुख त्याच्या कुटंबासोबत लवकरच दुसरीकडे राहण्यासाठी जाणार आहे.
सर्व कुटुंब राहणार रेंटेड अपार्टमेंटमध्ये
शाहरुख खान नव्या ठिकाणी रेंटवर त्याच्या परिवारासोबत राहणार आहे. यात त्याची पत्नी गौरी, सुहाना, अबराम आणि आर्यन या तिन्ही मुलांचा समावेश असेल. या सर्वांसाठी शाहरुख खानने चार मजली अपार्टमेंट भाड्याने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखने चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी यांच्याकडून शाहरुखने हा अपर्टमेंट भाड्याने घेतला आहे.
मन्नतच्या डागडुजीसाठी लागणार दोन वर्षे
शाहरुख खानसोबत त्याच्या कर्मचारीदेखील या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहेत. यात त्याच्या सुरक्षा रक्षकांचाही समावेश असेल. शाहरुखने हे अपार्टमेंट पुढच्या तीन वर्षांसाठी किरायाने घेतल्याचे म्हटले जात आहे. मन्नत बंगल्याच्या डागडुजीसाठी दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात शाहरुख खान याच नव्या अपार्टमेंटमध्ये राहणार आहे, असे म्हटले जात आहे.
हेही वाचा :
सौंदर्याची आणि अभिनयाची जादू पसरवणारी तमन्ना भाटियाचा जिम लूक; पाहा फोटो!























