Shah Rukh Khan : बॉलिवूडच्या किंग खानचा वाढदिवस, पण नेहमीच गजबज असणाऱ्या 'मन्नत' बाहेर मात्र शुकशुकाट
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुखचा आज वाढदिवस असूनही मन्नत बाहेर मात्र शांतता पाहायला मिळतेय.
Shah Rukh Khan : किंग खान म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुखचा (Shah Rukh Khan) आज 59 वा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसासाठी देशातील अनेक भागातून त्याचे चाहते मुंबईत येतात. तसेच आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुखही त्याच्या 'मन्नत' बाहेर येतो. पण यंदाचा हा वाढदिवस शाहरुखसाठी जरा वेगळा ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण एरवी बरीच गजबज असणाऱ्या मन्नतबाहेर मात्र शांतता आहे.
शाहरुखच्या 'मन्नत' घराबाहेर जमलेल्या हजारोंच्या गर्दीला पोलिसांनी हटवलं आहे. तसेच सकाळपासून मन्नतबाहेर उभं राहण्यास कुणालाही परवानगी नाही. सुरक्षेच्या कारणास्तव शाहरुखच्या चाहत्यांना मन्नतच्या बाहेर उभे राहण्याची परवानगी दिली जात नसल्याची माहिती सध्या समोर आलीये.
म्हणून शाहरुख 'मन्नत' बाहेर येणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर शाहरुख माध्यमांपासूनही बराच दूर राहिला आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड सेलिब्रेटी आणि पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे. कारण बाबा सिद्दीकी यांचं सलमान खान सोबतचं नातं चांगलं असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचं बिश्नोई गँगने सांगितलं आहे. त्यामुळेच शाहरुख खान आज मन्नत बाहेर पडणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.
पोलिसांची मन्नत बाहेर जमण्यास परवानगी नाकारली
दरम्यान दरवर्षीप्रमाणे जसा शाहरुख त्याच्या वाढदिवसाला मन्नत बाहेर येऊन त्याच्या चाहत्यांना झलक देतो तसा तो यंदाच्या वर्षी येणार नाही. कारण पोलिसांनीच त्यासाठी परवानगी नाकारली आहे. तसेच सकाळी 9.30 वाजल्यापासून मन्नत बाहेरुन गर्दी हटवण्यास पोलिसांनी सुरुवात केलीये. त्यामुळे सध्या मन्नत बाहेर बरीच शांतता आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी बरीच गर्दी जमा झाली होती. पण आता या परिसरामध्ये संपूर्ण शांतता पसरली आहे.
संघर्षाच्या काळात सलमानने केली शाहरुखची मदत
सलमान खान आणि शाहरुख खान चांगले मित्र आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये संघर्षाच्या काळात सलमानने शाहरुखला मदत केली होती. शाहरुख जेव्हा मुंबईत नवीन-नवीन आला होता आणि स्ट्रगल करत होता, तेव्हा सलमानने त्याची फार काळजी घेतली होती. शाहरुख अनेक वेळा सलमान खानच्या घरी जेवला. शाहरुखने एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, "मी आज इथे आहे, ते सलमान आणि त्याच्या कुटुंबामुळे आहे, कारण मी याच्या घरचं अन्न खाल्लं आहे". यानंतर स्ट्रगल आणि मेहनतीच्या बळावर शाहरुखने फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च नाव कमावलं आणि बॉलिवूडचा 'किंग' बनला.
ही बातमी वाचा :
दोन अफेयर अन् रेखासोबत गुपचूप लग्न, 'या' सुपरस्टारने चार वेळा केलं लग्न; तरीही नशीबी आला एकांतवास