Jawan : शाहरुख खान इतिहास रचणार! जगातील सर्वात मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा 'जवान'
Jawan Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा इतिहास रचणार आहे.
Shah Rukh Khan Jawan Release World Largest Cinema Screen : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. 'पठाण'नंतर (Pathaan) 'जवान' हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात धमाका करण्यासाठी सज्ज आहे. 'जवान' हा सिनेमा जगातील सर्वात सर्वात मोठ्या स्क्रीनवर रिलीज होणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. त्यामुळे किंग खान इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
शाहरुख खानचा 'जवान' कुठे प्रदर्शित होणार?
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा जर्मनी येथील लियोनवर्ग येथील मोठ्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आयमॅक्स स्क्रीन ट्रम्पलास्टवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, IMAX स्क्रीन 125 फूट रुंद आणि 72 फूट उंच आहे. या स्क्रीनवर प्रदर्शित होणारा 'जवान' हा पहिलाच भारतीय सिनेमा असणार आहे.
View this post on Instagram
जर्मनीमधील या सर्वात मोठी स्क्रीन असणाऱ्या सिनेमागृहाची स्थापना 6 डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आली आहे. या सिनेमागृहात सर्वात मोठी IMAX स्क्रीन आहे. या स्क्रीनची
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही नोंद करण्यात आली आहे. 814.8 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा सिनेमा हॉल आहे.
शाहरुखच्या 'जवान'बद्दल जाणून घ्या... (Shah Rukh Khan Jawan Movie Details)
'जवान' या सिनेमात शाहरुख खान वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे. 'जवान'ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी 'जवान' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी हा सिनेमा जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमांचे लोकप्रिय दिग्दर्शक एटली यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा 407 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात किंग खानसह नयनतारा, सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची झलक या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'जवान' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. येत्या 28 ऑगस्टला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
संबंधित बातम्या