Shah Rukh Khan : आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पुन्हा झळकण्यासाठी शाहरुख खान सज्ज; 'डंकी'ची चाहत्यांना उत्सुकता
Dunki : 'डंकी' या सिनेमात शाहरुख खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
![Shah Rukh Khan : आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पुन्हा झळकण्यासाठी शाहरुख खान सज्ज; 'डंकी'ची चाहत्यांना उत्सुकता Shah Rukh Khan Dunki Movie Update know details Shah Rukh Khan Dunki first look out army officer Shah Rukh Khan : आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत पुन्हा झळकण्यासाठी शाहरुख खान सज्ज; 'डंकी'ची चाहत्यांना उत्सुकता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/eba51f4377223405151ed0c8a33776cd1681376634999254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Dunki Movie Update : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. त्याचा 'डंकी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असून आता या सिनेमासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. 'डंकी' या सिनेमात किंग खान आर्मी ऑफिरच्या भूमिकेत दिसणार आहे.
आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा बादशाह
रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शाहरुख खान स्वत: म्हणाला होता की,'डंकी' या सिनेमाचं कथानक अशा लोकांवर आधारित आहे ज्यांना घरी येण्याची इच्छा आहे". मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान 'डंकी' या सिनेमात आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तो खूपच उत्सुक आहे. याआधी शाहरुख खान 'फौजी','मैं हूं ना' आणि 'जब तक है जान' या सिनेमांत आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसून आला होता.
'डंकी' कधी रिलीज होणार? (Dunki Release Date)
जिओ स्टुडिओजने नुकचीच 100 सिनेमांची घोषणा केली आहे. यात शाहरुखच्या 'डंकी' या सिनेमाचादेखील समावेश आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार हिरानी यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा डिसेंबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसोबत तापसी पन्नूदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
शाहरुखच्या 'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई!
शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने गेल्या काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या सिनेमाने जगभरात एक हजार कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
शाहरुखसाठी 2023 खास...
शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असून त्याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच खास असणार आहे. या वर्षात त्याचे अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 'पठाण'नंतर त्याचा 'जवान' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून या सिनेमात शाहरुखसह दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Dunki : ‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)