शाहरुख खान गौरीसाठी 5 वर्षे हिंदू म्हणून जगला, अशी आहे दोघांची प्रेम कहाणी
Shah Rukh khan-Gauri Khan Love Story : अभिनेता शाहरूख खान याने गौरीवर प्रेम केलं होतं. लग्नासाठी धर्माची भींत आडवी येणार हे सुद्धा दोघांना माहित होतं. परंतु, त्यांनी हार मानली नाही.
Shah Rukh khan-Gauri Khan Love Story : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि गौरी खान हे इंडस्ट्रीतील सर्वात प्रेमळ आणि आनंदी वैवाहिक जोडपे मानले जाते. दोघांच्या लग्नाला 30 वर्षे झाली आहेत. परंतु, त्यांच्या नात्याची क्रेझ आजही कायम आहे. प्रत्येक प्रेम कथांप्रमाणे शाहरुख आणि गौरीच्या प्रेम कथेतही काही चढ-उतार होते. या दोघांच्या प्रेमालाही अनेक अडचणी आल्या. परंतु, आजपर्यंत दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. ते दोघे आज आदर्श जीवन जगत आहेत.
शाहरूख खान याने गौरीवर प्रेम केलं होतं. लग्नासाठी धर्माची भींत आडवी येणार हे सुद्धा दोघांना माहित होतं. परंतु, त्यांनी हार मानली नाही तर आपल्या नात्याला लग्नापर्यंत घेऊन गेले.
शाहरूख आणि गौरीची पहिली भेट मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. शाहरूखने गौरीला पार्टीत पहिल्यांदा पाहिले होते. त्यावेळी ती मित्रासोबत डान्स करत होती. शाहरूखलाही गौरीसोबत डान्स करायचा होता. परंतु, त्याचे धाडस होत नव्हते. थोड्या वेळाने त्याने धाडस करून डान्ससाठी विचारले तर गौरीने बॉयफ्रेन्डची वाट पाहात असल्याचे उत्तर दिले. परंतु, येणारा तिचा बॉयफ्रेन्ड नव्हाता तर तो तिचा भाऊ होता, हे शाहरूखला नंतर समजले. या एका प्रसंगावरूनच दोघांमधील संवाद सुरू झाला.
शाहरूख गौरीसाठी खूप पझेसिव होता. तिला शाहरूखची हीच गोष्ट आवडत नव्हती. परंतु, एक दिवस शाहरूखने धाडस करून गौरीला आपल्या प्रेमाबद्दल सांगितले आणि येथूच दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली.
थोड्या वर्षाच्या मैत्रीनंतर शाहरूख आणि गौरीने लग्नाबद्दल आपापल्या घरी सांगितले. त्यावेळी त्यांच्या प्रेमात धर्माची भींत आडवी आली. त्या वेळी शाहरूख स्ट्रगल करत होता. गौरीच्या आई-वडिलांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. तरीही दोघे जण आपल्या प्रेमावर ठाम होते.
शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झाले. पण गौरीच्या कुटुंबासाठी शाहरुख खान पाच वर्षे हिंदू म्हणून जगला. परंतु, सत्य बाहेर आल्यानंतर गदारोळ झाला. त्यामुळे या दोघांनाही तीन वेळा लग्न करावे लागले. यातील पहिला विवाह कोर्ट मॅरेज, दुसरा मुस्लिम रितीरिवाजानुसार निकाह आणि तिसरा विवाह पंजाबी पद्धतीने केला.
लग्नानंतर हळूहळू सगळं सुरळीत झालं. शाहरुख आणि गौरी यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे अनेक प्रसंगातून समोर आले आहे. दोघांना सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान अशी तीन मुले आहेत.
महत्वाच्या बातम्या