(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shah Rukh Khan Accident : शाहरुख खानचा अमेरिकेत अपघात; नाकाला झाली दुखापत, डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अपघात झाला आहे.
Shah Rukh Khan Accident : अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) शूटिंगसाठी गेला होता, तिथे त्याचा अपघात झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, या अपघातात शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली. अपघातानंतर शाहरुखच्या नाकाची शस्त्रक्रियाही करावी लागली. शाहरुखच्या नाकाला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला, त्यानंतर रक्तस्त्राव थांबण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.
एका रिपोर्टनुसार, शाहरुख खान लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होता, तिथे त्याला नाकाला दुखापत झाली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला, त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी शाहरुखच्या टीमला सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल. शाहरुख आता भारतात परतला असून तो या दुखापतीतून सावरत आहे, असं म्हटलं जात आहे. शाहरुखच्या टीमकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
शाहरुखचे चित्रपट
शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या महिन्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे, असं म्हटलं जात आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट अॅटली कुमार हा दिग्दर्शित करत आहे. जवान हा शहारुखचा चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. याशिवाय राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटात देखील शाहरुख काम करणार आहे, या चित्रपटात तापसी पन्नू देखील महत्वाची भूमिका साकारत आहे.
View this post on Instagram
'पठाण' चित्रपटाला मिळाली प्रेक्षकांची पसंती
शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जगभरात या चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटामधील अॅक्शन सिन्सचं अनेकांनी कौतुक केलं.
शाहरुख हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्याचे चित्रपट हिट ठरले.
इतर महत्वाच्या बातम्या: