Scam 2003 Teaser: हर्षद मेहतानंतर आता तेलगी; हंसल मेहता यांच्या स्कॅम 2003 सीरिजचा टीझर आला प्रेक्षकांच्या भेटीस
हंसल मेहता (Hansal Mehta) यांची स्कॅम 2003 वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Scam 2003 Teaser: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील स्कॅम 1992 (Scam 1992) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या सीरिजमध्ये हर्षद मेहताची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली होती. या सीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधी (Pratik Gandhi) या अभिनेत्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. या सीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं. आता हंसल मेहता (Hansal Mehta) यांची स्कॅम 2003 ही एक नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजमध्ये 2003 मधील तेलगी प्रकरण दाखण्यात येणार आहे.
स्कॅम 2003 या सीरिजच्या टीझरच्या सुरुवातीला स्कॅम 1992 या सीरिजचा टायटल ट्रॅक ऐकू येतो. टीझर पाहिल्यानंतर लक्षात येते की स्कॅम 2003 या वेब सीरिजमध्ये मध्ये तीस हजार करोडच्या स्कॅमची कथा दाखवण्यात येणार आहे. "मेरेको पैसे कमाने का कोई शौक नही, है क्यूंकी पैसा कमाया नही बनाया जाता है." हा डायलॉग स्कॅम 2003 या सीरिजच्या टीझरमध्ये ऐकू येतो.
हंसल मेहता यांनी 'स्कॅम 2003' या वेब सीरिजचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'लाइफ में आगे बढ़ना है तो डेयरिंग तो करना पड़ेगा ना डार्लिंग' हंसल मेहता यांनी शेअर केलेल्या 'स्कॅम 2003' या सीरिजच्या टीझरवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
'स्कॅम 2003' कधी होणार रिलीज?
'स्कॅम 2003' ही वेब सीरिज 2 सप्टेंबर 2023 रोजी सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.या सीरिजमध्ये अभिनेता गगन देव रियार हा तेलगीची भूमिका साकारणार आहे असं म्हटलं जात आहे. प्रेक्षक 'स्कॅम 2003' या वेब सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हंसल मेहता यांनी 'स्कॅम 1992' ही वेब सीरिज दिग्दर्शित केली होती, पण 'स्कॅम 2003' या वेब सीरिजचे ते शो रनर आहेत. 'स्कॅम 2003' चे दिग्दर्शक तुषार हिरानंदानी हा आहे. 'एक व्हिलन', 'फालतू' आणि 'टोटल धमाल' सारखे चित्रपट लिहिणाऱ्या तुषारने 'सांड की आँख' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
संंबंधित बातम्या
Scam 2003 Teaser : 'स्कॅम 1992' नंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'स्कॅम 2003 द तेलगी स्टोरी'
























