Sara Ali khan : सारा अली खानच्या बॅटिंगने चाहते क्लीन बोल्ड
Sara Ali khan : अभिनेत्री सारा अली खानच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. यावेळी साराने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. साराने क्रिकेट खेळतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
Sara Ali khan : अभिनेत्री सारा अली खानच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. साराचं गोड हसणं असो किंवा गोंडस भाव. प्रत्येक वेळी तिने प्रेक्षकांची मने जिंकली. साराने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यावेळी साराने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. साराने क्रिकेट खेळतानाचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होतं आहेत.
सारा अली खान सध्या 'अतरंगी रे' (Atrangi Re) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'अतरंगी रे' चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान साराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये लेहेंगा घालून सारा क्रिकेट खेळताना पाहायला मिळतेय. या फोटो मध्ये सारा पारंपारिक अंदाजात पाहायला मिळतेय. यामध्ये ती ऑरेंज रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो 'अंतरंगी रे' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे आहेत.
सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar), धनुष (Dhanush) आगामी 'अतरंगी रे' (Atrangi Re) सिनेमातील 'चका चक' (Chaka Chak) हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर खूप पसंतीस उतरलं आहे. अतरंगी रे' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. डिज्नी हॉटस्टारवर 24 डिसेंबर 2021 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा अली खान रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'अतरंगी रे' सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Bajrangi Bhaijaan 2: लवकरच येतोय 'बजरंगी भाईजान'चा सीक्वल, सलमान खानची घोषणा
- Priya Bapat : प्रिया बापटचं निखळ हास्य, चाहते घायाळ
- श्रीलंकेकडून 43 भारतीय मच्छिमारांना अटक, 6 बोटीही ताब्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha