एक्स्प्लोर

चौथ्या दिवशीही 'संजू' सुसाट, एकूण कमाई...

पहिल्या सोमवारी 25.35 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या ‘रेस 3’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या नावावर होता.

मुंबई : बॉक्स ऑफिसवर ‘संजू’ने सोमवारीही बक्कळ गल्ला जमवला. पहिल्या सोमवारी 25.35 कोटींची कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या ‘रेस 3’ आणि संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या नावावर होता. 'संजू'ने पहिल्या चार दिवसात एकूण 145.51 कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी 34.75 कोटी, शनिवारी 38.60 कोटी रुपये, रविवारी विक्रमी 46.71 आणि सोमवारी म्हणजे चौथ्या दिवशी या सिनेमाने 25.35 कोटींची कमाई केली. रविवारी संजूने 46.71 कोटींचा गल्ला जमवला होता. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा हा पहिलाच सिनेमा आहे. वीकेंडला कमाई करणारे या वर्षातील टॉप 5 सिनेमे संजू : 120.6 कोटी पद्मावत : 114 कोटी (बुधवार प्रीव्ह्यू शो, आणि गुरुवारी रिलीज) रेस 3 : 106.47 कोटी बाघी 2 : 73.10 कोटी रेड : 41.01 कोटी राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' चित्रपटात रणबीर कपूर, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, मनिषा कोईराला, परेश रावल, विकी कौशल, करिष्मा तन्ना, महेश मांजरेकर अशी कलाकारांची फौज आहे. 2018 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 'संजू'ने सलमान खानचा 'रेस 3', टायगर श्रॉफचा 'बागी 2' आणि दीपिका-रणवीरच्या 'पद्मावत' या सिनेमांना अगोदरच मागे टाकलं होतं. सलमान खानच्या 'रेस-3' ने पहिल्या दिवशी 29.17 कोटी, 'बागी-2' ने 25.10 कोटी कमावले होते. चौथ्या क्रमांकावर 'पद्मावत' (19 कोटी) तर पाचव्या क्रमांकावर 'वीरे दी वेडिंग (10.70 कोटी) आहे. नॉन हॉलिडे (बँक हॉलिडे नसलेल्या शुक्रवारी) प्रदर्शित होऊन सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही संजूने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात 'संजू' हा नॉन हॉलिडेला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. 'बाहुबली' (122 कोटी) हा या यादीतील अव्वल चित्रपट आहे. रणवीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणवीरच्या चित्रपटांमध्ये 'बेशरम'ने पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Hollywood Actor: सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टी शोकाकुल; प्रसिद्ध युवा अभिनेत्याचे निधन, अवघ्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Mamachya Govyala Jauya Box Office Collection: 7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?
7 कोटींच्या मराठी सिनेमानं बॉक्स ऑफिस हादरवलं; स्पायडर मॅनच्या वादळातही घट्ट पाय रोवून उभा, 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'ला पछाडणार?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget