एक्स्प्लोर
'संजू'मध्ये कमली साकारणारा खरा कमलेश कोण?
या सिनेमात जसं रणबीरच्या अभिनयाचं कौतुक होत आहे, तसंच संजूच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलही वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने संजय दत्तच्या कमलेश नावाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

मुंबई: अभिनेता संजय दत्तची बायोपिक संजू सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शुक्रवारी 29 जून रोजी प्रदर्शित झालेल्या संजू सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. या सिनेमाने अवघ्या तीन दिवसात 120 कोटींपेक्षाही जास्त गल्ला जमवला आहे. त्यामुळे हा सिनेमा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा यंदाचा पहिला सिनेमा ठरला आहे. या सिनेमात जसं रणबीरच्या अभिनयाचं कौतुक होत आहे, तसंच संजूच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलही वाहवा मिळवत आहे. विकी कौशलने संजय दत्तच्या कमलेश नावाच्या मित्राची भूमिका साकारली आहे. संजूचा मित्र कमलेशचं खरं नाव काय? या सिनेमात संजय दत्तचा अगदी जीवलग मित्र कमलेश उर्फ कमली दाखवण्यात आला आहे. पिंकविला रिपोर्टनुसार संजय दत्तच्या खऱ्या आयुष्यातील या जीवलग मित्राचं नाव परेश गिलानी आहे. परेशची भूमिका कमलेशच्या रुपात विकी कौशलने केली आहे. बिझनेसमन परेश परेश गिलानी हे एक बिझनेसमन आहेत. ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. परेश आणि संजय दत्तची मैत्री शाळेत झाली होती. दोघे नेहमीच एकमेकासोबत होते. दोघांनी कठीण काळात एकमेकांना साथ दिली. संजय दत्तची आई नर्गिस दत्त रुग्णालयात दाखल असतात, तेव्हा कमलेश आणि संजू यांची भेट होते असं या सिनेमात दाखवलं आहे. कमलेश स्वत: नर्गिस यांचा मोठा फॅन आहे. दोघांची मैत्री काळानुसार घट्ट होत जाते. परेश खूपच लाजरेबुजरे असल्याने, ते संजूसोबत कधी स्पॉटलाईटमध्ये आले नाहीत. 'संजू'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडत रविवारी 46.71 कोटींची कमाई केली. एकाच दिवशी सर्वाधिक 46.50 कोटींची कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली 2 च्या नावावर होता. 'संजू'ने पहिल्या तीन दिवसात एकूण 120.6 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेमाच्या इतिहासात एका दिवसात एवढी कमाई करणारा संजू पहिलाच सिनेमा आहे.
संबधित बातम्या
'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला
...जेव्हा सुटकेसाठी संजय दत्त बाळासाहेबांना शरण गेला होता!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























