Sanjay Dutt : संजय दत्त आजही आईचे संस्कार विसरला नाही; मातृदिनानिमित्त भावुक पोस्ट, चाहत्यांनाही अश्रू अनावर
Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्तने आज मातृदिनानिमित्त एक खास भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संजू बाबाने एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.
![Sanjay Dutt : संजय दत्त आजही आईचे संस्कार विसरला नाही; मातृदिनानिमित्त भावुक पोस्ट, चाहत्यांनाही अश्रू अनावर Sanjay Dutt Emotional Post on Mothers Day 2024 Shared an Old Photo With A Special Note Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Sanjay Dutt : संजय दत्त आजही आईचे संस्कार विसरला नाही; मातृदिनानिमित्त भावुक पोस्ट, चाहत्यांनाही अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/12/c63dc63b1d344ce74537cf1cca03410a1715501958356254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sanjay Dutt : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) मातृदिनानिमित्त (Mother's Day 2024) आई नरगिस दत्तसाठी (Nargis Dutt) एक खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करण्यासोबत त्याने आईचा गोड फोटोदेखील शेअर केला आहे. संजू बाबाने फोटो शेअर करत लिहिलं आहे,"प्रेम कसं करायचं हे ज्या व्यक्तीने मला शिकवलं त्या माझ्या आयुष्यातील खास महिलेला मातृदिनाच्या शुभेच्छा. शांततेच आयुष्य कसं जगायचं हे मी आईकडून शिकलो आहे. आईचे खूप खूप आभार...आईवर माझं खूप प्रेम आहे". पोस्ट शेअर करण्यासोबत संजू बाबाने नरगिसचा एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोदेखील शेअर केला आहे.
संजू बाबाची पोस्ट पाहून चाहते भावूक (Sanjay Dutt Post)
संजय दत्तची पोस्ट पाहून चाहते भावुक झाले आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे,"सर तुम्हाला नेहमीच तुमच्या आई-वडिलांची आठवण येत असते". दुसऱ्याने लिहिलं आहे,"भावा तू आईला जितकं मीस करतोस तेवढं तुला कोणीच करत नाही", खूप प्रेम भावा". संजय दत्त हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते सुनील दत्त आणि नरगिस दत्त यांचा मोठा मुलगा आहे. नम्रता दत्त आणि प्रिया दत्त या दोन बहिणी त्याला आहेत. संजय दत्त आई-वडिलांप्रमाणे सिनेसृष्टीत सक्रीय आहे. पण त्याच्या बहिणी मात्र ग्लॅमरस जगापासून दूर आहेत.
अभिनेत्री नरगिस यांचे 3 मे 1981 रोजी मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. निधनाआधी त्या अमेरिकेत कर्करोगावर उपचार करुन भारतात आल्या होत्या. नरगिस यांची शेवटची इच्छा होती की त्या आपल्या मुलाच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमिअरला हजेरी लावतील. पती आणि मुलाच्यामध्ये बसून चित्रपट पाहण्याची त्यांची इच्छा होती. पण असं काहीही झालं नाही. 6 मे 1981 रोजी 'रॉकी' हा चित्रपट रिलीज होणार होता. 5 मेच्या रात्री या चित्रपटाचा प्रीमियर होता. पण त्याआधीच नरगिस यांचे निधन झाले. संजय दत्तचा रॉकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. सुनील दत्तने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनची धुरा सांभाळली होती.
कोण आहे संजय दत्त? (Who is Sanjay Dutt)
संजय दत्त हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेत्याने आजवर अनेक चढ-उतार पाहिले आहेत. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संजय दत्तने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : संजय दत्तऐवजी शाहरुख असता 'मुन्नाभाई', त्या एका गोष्टीने...; मकरंद देशपांडेने सांगितला किस्सा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)