एक्स्प्लोर

Sandeep Reddy Vanga : संदीप रेड्डी वांगाकडून चित्रपटाची जुळवाजुळव; लीड रोलमध्ये साऊथची सुपरहिट स्टारकास्ट

Sandeep Reddy Vanga : अॅनिमल नंतर आता संदीप रेड्डी वांगा आता नव्या चित्रपटाची जुळवाजुळव करत आहे.

Sandeep Reddy Vanga :  'अॅनिमल'ने (Animal) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता संदीप रेड्डी वांगाकडून (Sandeep Reddy Vanga) नव्या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा आहे. संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटात साऊथची सुपरहिट स्टारकास्ट असून ही जोडी पहिल्यांदाच एकत्रपणे रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपटावर संदीप रेड्डी वांगाची छाप सोडणारा असल्याचे म्हटले जात आहे.

संदीपचा नवा चित्रपट कोणता?

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित अॅनिमल चित्रपटाने  बॉक्स ऑफिसवर  दमदार कमाई करत  कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली. अॅनिमलचे प्रेक्षकांकडून कौतुकही झाले तसे चित्रपटातील हिंसक चित्रणावर टीकाही झाली. मात्र, टीकाकारांकडे आपण दुर्लक्ष करत असल्याचे संदीपने स्पष्ट केले. त्यानंतर संदीपच्या आगामी चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. संदीप आता 'स्पिरीट'या चित्रपटाची जुळवाजुळव करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संदीपच्या नव्या चित्रपटात कोण? 

संदीप रेड्डीच्या या नव्या चित्रपटात रश्मिका मंदाना असणार आहे. रश्मिकासोबत 'बाहुबली'फेम अभिनेता प्रभास दिसणार आहे. रश्मिका आणि प्रभासचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असून, दोघेही पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. 

Siasat ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत रश्मिका मंदान्नाचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. याआधी ती त्याच्या 'अॅनिमल'मध्ये दिसली होती. यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका होत्या. 

यावर्षी सुरू होणार चित्रपटाचे चित्रीकरण 

स्पिरीट चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे संदीप वांगा रेड्डीने म्हटले होते. 

'पुष्पा-2'च्या चित्रीकरणात रश्मिका व्यस्त 

रश्मिका मंदना ही सध्या 'पुष्पा-2'च्या चित्रीकरणात व्यस्त असल्याची माहिती आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन लीड रोलमध्ये आहे. चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादमध्ये सुरू आहे. 15 ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

प्रभासकडे कोणता चित्रपट?

प्रभासचा 'सालार'चित्रपट झळकला होता. आता तो 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. यात दीपिका पदुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांची भूमिका आहे. हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget