Sanam Teri Kasam 2 : 'सनम तेरी कसम 2' बद्दल मोठी अपडेट, री-रिलीजच्या यशानंतर सीक्वेलची प्रतीक्षा; केव्हा येणार पार्ट 2?
Sanam Teri Kasam 2 : 'सनम तेरी कसम 2' चित्रपट कधी येणार असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. आता याच्या सीक्वेलबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Sanam Teri Kasam 2 : अभिनेता हर्षवर्धन राणे याचा 'सनम तेरी कसम' चित्रपट री-रिलीजमध्ये धमाका करताना दिसत आहे. 'सनम तेरी कसम' चित्रपट रिलीज झाल्यानंतर नऊ वर्षांनी पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल झाला आणि प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे. नऊ वर्षांपूर्वी सनम तेरी कसम चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. मात्र, आता या चित्रपटाने चांगलं कलेक्शन केलं आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला आहे.
'सनम तेरी कसम 2' बद्दल मोठी अपडेट
सध्या चित्रपटांच्या री-रिलीजचा ट्रेंड सुरु आहे. री-रिलीजमध्ये चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. 2016 मध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन स्टारर 'सनम तेरी कसम' चित्रपट बॉक्स ऑफिसमध्ये दाखल झाला. मात्र, 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने फक्त 16 कोटींचा गल्ला जमवला आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आणि री-रिलीजच्या दुसऱ्या आठवड्याच्या आतच या चित्रपटाने पहिल्या रिलीजच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकलं आहे. चित्रपटाचं रि-रिलीज कलेक्शन दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल एक अपडेट आली आहे.
'सनम तेरी कसम'चा दुसरा भाग कधी येईल?
'सनम तेरी कसम'च्या री-रिलीजच्या यशानंतर चाहते आता सनम तेरी कसमच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सनम तेरी कसम 2' चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. निर्मात्या राधिका राव आणि विनय सप्रू यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग बनवण्यात आला होता, तेव्हा तो दोन भागात लिहिला गेला होता. त्यामुळे आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कथा देखील तयार आहे. दुसऱ्या भागात इंदरचे पुढचं व्हिजन दाखवण्यात येणार आहे. 'सनम तेरी कसम' चित्रपटाचा शेवटचा पार्ट अशा प्रकारे डिझाइन करण्यात आला होता की, तो दुसऱ्या भागाशी जोडता येईल.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Saif Ali Khan Interview : 'माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार', चाकूहल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खानची सविस्तर मुलाखत























