एक्स्प्लोर

Sameer Wankhede : "मी मोदी, शाहांना मानतो, बॉलिवूड स्टार्स माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत"; आर्यन खान प्रकरणामुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे स्पष्टच म्हणाले

Sameer Wankhede on Bollywood : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (Aaryan Khan Drugs Case) समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड, बॉलिवूड स्टार्स, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.

Sameer Wankhede : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) यांना मी मानतो. तसेच ते खऱ्या अर्थाने सेलिब्रिटी आहेत. बॉलिवूड स्टार्स सेलिब्रिटी माझ्यासाठी सेलिब्रिटी नाहीत, असं वक्तव्य आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (Aaryan Khan Drugs Case) चर्चेत आलेल्या समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी केलं आहे.रोखठोक, बेधडक आणि कर्तव्यदक्ष असे सरकारी अधिकारी अशी समीर वानखेडे यांची ओळख आहे.

समीर वानखेडे यांनी 'aakar Digi9'च्या प्रभाकर सूर्यवंशी यांना दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड स्टार्स, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. समीर वानखेडे यांना त्यांच्या कारकीर्दीत सातत्याने कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींनी फेस करावं लागतं. विमानतळावर कोणालातरी अडवणं यात मिका सिंह (Mika Singh), शाहरुख खान (Shah Rukh Khan) अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश असतो. पण सर्वसामान्यांसाठी सेलिब्रिटी असणारे हे बॉलिवूडकर समीर वानखेडेंसाठी मात्र सेलिब्रिटी नाहीत.

समीर वानखेडे म्हणाले,"बॉलिवूडचे अभिनेते कोणासाठी सेलिब्रिटी असतात? माझ्यासाठी ते अजिबात सेलिब्रिटी नाहीत. माझ्यासाठी सेलिब्रिटीची व्याख्या वेगळी आहे. बाबा आमटे (Baba Amte), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), तान्हाजी मालुसरे (Tanhaji Malusare), बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande). तसेच आजच्या काळातले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah), माझ्यासाठी हे सगळे खरे नायक आहेत. बाकीच्यांना मी अजिबात सेलिब्रिटी आणि नायक मानत नाही.

समीर वानखेडे पुढे म्हणाले,"माझ्यासाठी माझं संविधान, माझे कायदे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या केसेस या माझ्यासाठी खूपच नॉर्मल आहेत. मी कायद्याचं पालन करतो. त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. मी कोणाला घाबरत नाही. मला फक्त दोन लोकांना तोंड दाखवायचं आहे. माझी राष्ट्रआई भारतमाता आणि माझ्या खऱ्या आईला. बाकी कोणाला मी मानत नाही".

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण माझ्या आयुष्यातील सर्वात छोटी केस : समीर वानखेडे

समीर वानखेडे सर्वपरिचित झाले ते आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे. पण या प्रकरणाआधी त्यांनी अनेक धाडी टाकल्या आहेत. जिवावर उदार होत गुन्हेगारांना फेस केलं आहे. पण या सर्व गोष्टींची कधी चर्चा झाली नाही. याबद्दल बोलताना समीर वानखेडे म्हणाले,"आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ही माझ्या आयुष्यातील सर्वात छोटी केस होती. पण लोकांना ती फार महत्त्वाची वाटली. त्यावेळी मला कोणीच विचारलं नाही की आधी तीन हजार केस केल्या होत्या.  भारतात सर्वात पहिलं इस्लामिक स्टेट विरोधात केस केली, झाकीर नाईक (Zakir Naik) सारख्या आतंकवादीवर केस केली होती, आतापर्यंत 17 हजार किलो ड्रग्ज पकडले आहेत, देशासाठी रक्त वाहिलं आहे. त्यावेळी त्या रक्ताचा रंग कोणता हे कोणी विचारलं नाही. बौद्ध आहे की महार आहे, हिंदू आहे की मुस्लिम आहे या गोष्टी कोणी नाही विचारल्या. ओडीशामध्ये सहा हजार किलो ड्रग्ज पकडले होते ही माझ्या आयुष्यातील मोठी केस पण याबद्दल कोणी एका शब्दाचा उल्लेख करत नाही".

समीर वानखेडे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर तपास केला आहे. त्याच्याबद्दल बोलताना (Sameer Wankhede On Sushant Singh Rajput) म्हणाले,"सुशांत सिंह राजपूत हा डाऊन टू अर्थ पर्सन आहे. त्याचा आत्मा खूप चांगला होता. तो आऊट ऑफ बॉक्स विचार करणारा होता".

संबंधित बातम्या

Kranti Redkar Death Threat : समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरला थेट पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget