एक्स्प्लोर
सलमानच्या चार बिग बजेट चित्रपटांचं भवितव्य अधांतरी
सलमानवर बॉलिवूड आणि टीव्ही विश्वाचे जवळपास 600 कोटी रुपये लागले आहेत. त्यामुळे सलमानची जेलवारी मनोरंजन विश्वालाच चांगलीच महागात पडेल.
मुंबई : बॉलिवूडचा सुलतान सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सलमानच्या तुरुंगवारीमुळे बॉलिवूडमधील अनेक चित्रपट पणाला लागले आहेत. चार मोठे चित्रपट आणि दोन टीव्ही शोज् मध्ये सलमान झळकणार आहे.
सलमान खानची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कोर्टात होणार आहे. सलमानवर बॉलिवूड आणि टीव्ही विश्वाचे जवळपास 600 कोटी रुपये लागले आहेत. त्यामुळे सलमानची जेलवारी मनोरंजन विश्वालाच चांगलीच महागात पडेल.
रेस थ्री - हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं बजेट 100 कोटींपेक्षा जास्त आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असलं तरी तो हिट करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांना प्रमोशनसाठी सलमानची गरज भासेल.
भारत - हा सलमानचा बिग बजेट आणि महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. जवळपास दोनशे कोटी रुपये इतकं 'भारत'चं बजेट आहे. सिनेमाचं शूटिंग जून महिन्यात सुरु करण्याचं प्लॅनिंग होतं.
किकचा सिक्वल - साजिद नाडियादवाला यांनी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किक' सिनेमाच्या सिक्वलची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर अद्याप काम सुरु आहे.
दबंग 3 - दबंग चित्रपटातील चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांची मनं जिंकली. आता दबंगच्या तिसऱ्या भागाची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.
टीव्ही शो -
बिग बॉस - बिग बॉसच्या पुढच्या सिझनसाठी कलर्स वाहिनी साहजिकच सलमान खानची निवड करणार. सलमान प्रत्येक एपिसोडसाठी 11 कोटी रुपयांचं मानधन घेतो. ऑक्टोबरमध्ये बिग बॉसचं बारावं पर्व सुरु होईल.
दस का दम 3 - दस का दम या गेम शोच्या तिसऱ्या सिझनसाठीही सलमानने होकार दिला आहे. या शोचे वीस भाग येणार असून एकूण 78 कोटी रुपयांचं मानधन सलमान घेणार आहे.
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
कलम 51 अर्थात वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत सलमानला दोषी धरण्यात आलं असून, त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर सलमानला सेंट्रल जेलमध्ये नेण्यात येणार आहे
नेमकं प्रकरण काय आहे?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं असल्याचं म्हटलं जातं. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाचं शूटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला.
यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत.
संबंधित बातम्या :
सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड
निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!
...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!
जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन
आर्म्स अॅक्ट प्रकरण : कोर्टात जात विचारल्यावर सलमान म्हणाला...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement