एक्स्प्लोर
खिलाडी अक्षयसाठी दबंग सलमानचे चाहत्यांना आवाहन
मुंबई : प्रमोशन आणि आपल्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असतात. नुकतंच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा "रूस्तम" पाहण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे.
सलमानने फेसबुक आणि ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा रूस्तम पाहण्यासाठी आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहनही केले आहे. यात त्याने "आमच्या इंडस्ट्रीच्या रूस्तम-ए-हिंदची फिल्म 12ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 12 ऑगस्टला जाऊन पाहा फिल्म रुस्तम" असं सांगितलं आहे.
सलमानने हा व्हिडीओ #10daysofRustom या कॅप्शनसह शेअर केला आहे. त्याचे ट्वीट 48 हजारहून जास्त वेळा रिट्वीट केलं असून फेसबुकवर 10 लाखवेळा पाहिला आहे. तसेच 4864 वेळा शेअरही करण्यात आला.
#10DaysToRustom @akshaykumar pic.twitter.com/Yd50voI8Av
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 2, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement