एक्स्प्लोर
सेफ ड्रायव्हिंगवर लेक्चर, नेटिझन्सकडून सलमान ट्रोल

मुंबई : वाहनं सुरक्षितपणे चालवा, असा संदेश तरुणांना सोशल मीडियावरुन देणारा सुपरस्टार सलमान खान स्वतःच थट्टेचा विषय ठरला आहे. हिट अँड रन प्रकरणात सलमानची निर्दोष सुटका झाली असली, तरी नेटिझन्सनी सलमानची खिल्ली उडवली आहे. बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्या तरुणांना सलमानने ट्विटरवरुन सल्ला दिला. सलमानच्या 'बीईंग ह्युमन'ने ई-सायकलचं लाँचिंग केलं. 'सायकल्स ठीक आहेत, मात्र मोटरसायकल्स तरुणांसाठी आणि त्यांच्या भोवताली असणाऱ्या व्यक्तींसाठी फार धोकादायक आहेत. आम्ही फिल्मसिटीमध्ये शूटिंग करतो, मात्र तरुण ही स्टंटबाजी हायवेवर करताना दिसतात' असं सलमान म्हणाला होता. 2002 च्या हिट अँड रन प्रकरणात सलमान खान अडकला होता. फुटपाथवर झोपलेल्या एकाचा कारखाली चिरडून मृत्यू झाला होता, तर चार जण जखमी झाले होते. या अपघातातून सलमानची निर्दोष सुटका झाली असली, तरी ट्विटराईट्सनी त्याचं ट्रोलिंग करण्याची संधी सोडली नाही. https://twitter.com/BeingSalmanKhan/status/871684518935015425 https://twitter.com/Sreeep/status/872026017635946497 https://twitter.com/TheDhinchakName/status/871987433339928576 https://twitter.com/ForwardDefence/status/872021871499370496
आणखी वाचा























