(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salman Khan: सलमानच्या शर्टलेस फोटोवर चाहते फिदा; म्हणाले, '58 व्या वर्षी सिक्स पॅक्स...'
बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे.
Salman Khan: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. या सेलिब्रिटींनी शेअर केलेले त्यांचे व्हिडीओ आणि फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे. फोटोमधील सलमानच्या सिक्स पॅक्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सलमाननं बुधवारी (5 एप्रिल) सोशल मीडियावर त्याचा शर्टलेस फोटो शेअर केला. या फोटोला सलमाननं कॅप्शन दिलं, 'तुम्हाला वाटत असेल की, मी आराम करत आहे, पण तसं नाहीये.' सलमानच्या या फोटोवर त्याच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सलमाननं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'त्याला 58 व्या वर्षी सिक्स पॅक्स आहेत आणि माझं वयाच्या 35 व्या वर्षी बेकरी प्रोडक्ट्स खाऊन पोट वाढलं आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'भाई, एवढीपण बॉडी नको करु की स्टंट मॅन किंवा बॉडी डबल मिळणं कठीण होईल.'
View this post on Instagram
सोशल मीडियावर सलमानची क्रेझ
सलमान खान हा सोशल मीडियावर त्याच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर त्याला 59 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. सलमान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी चित्रपटांची माहिती प्रेक्षकांना देतो.
सलमानचे आगामी चित्रपट
सलमान खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या चित्रपटांमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'टायगर 3'मध्ये त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसणार आहे. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 'किसी का भाई किसी की जान चित्रपटातील येंतम्मा, जी रहे थे हम ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सकतेने वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Salman Khan : सलमान खानच्या फोटोवर चाहते फिदा; म्हणाले,"बॉलिवूडची शान भाईजान"