...अन् सलमान खान मृत्यूच्या दारातून परतला, भाईजानने सांगितला विमानात घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग!
सलमान खानने त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. विमानात बसलेला असताना तो मृत्यूच्या दाढेतून परत आला होता.

Salman Khan Podcast : सलमान खानच्या पॉडकास्टची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक खास किस्से सांगितले आहेत. विशेष म्हणजे या पॉडकास्टमध्ये सलमान खानचा भाचा अरहान खान दिसत आहे. सलमानने या पॉडकास्टमध्ये एक अतिशय भीषण प्रसंग सांगितला आहे. सलमान खान तेव्हा मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला होता.
सलमान खानने सांगितला धक्कादायक प्रसंग
अरहान खान आणि त्याच्या मित्रांचे डंब बिर्याणी हे एक यूट्यूब चॅनेल आहे. या यूट्यूब चॅनेल्सवर ते वेगवेगळ्या सिनेस्टार्ससोबत गप्पा मारतात. तसेच इतरही अनेक प्रसंगांचे व्हिडीओ टाकतात. त्यांनी नुकतेच सलमान खानसोबतचा एक पॉडकास्ट आपल्या यूट्यूब चॅनेलवर टाकला आहे. याच पॉडकास्टमध्ये विमानातून प्रवास करत असताना घडलेला धक्कादायक प्रसंग सलमानने सांगितला आहे.
सलमान खान श्रीलंकेहून भारतात परतत होता
सलमान खान या पॉडकास्टमध्ये हेडफोन वापरण्याच्या सवयीबाबत बोलत होता. यात तो अरबाज खानचा मुलगा अरहान याला सल्ला देताना दिसतोय. दोन्ही कानांत कधीच हेडफोन लावू नये. एक कान नेहमीच मोकळा ठेवायला हवा. तुमच्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय, याकडे लक्ष द्यायला हवं, असं सलमान सांगताना दिसतोय. हा संवाद चालू असतानाच सलमानने श्रीलंकेवरून भारतात परतताना विमानात नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती दिली आहे.
विमान अचानक हलायला लागले
सलमान खानने सांगितलं की, आम्ही तेव्हा आयफा अवॉर्डच्या कार्यक्रमातून सहभागी होऊन श्रीलंकेतून भारतात परतत होतो. त्यावेळी एक प्रसंग घडला होता. आम्ही सगळे हसत होतो. मात्र त्याच वेळी अचानक विमानात गड गड गड आवाज येऊ लागला. विमान हालत होते. काही काळानंतर पुन्हा गडगड सुरू झाली. हे साधारण 45 मिनिटे चालू होते. विमानात घडत असलेला प्रकार पाहून आम्ही सगळे गप्पा बसले होतो.
विमानातील हवाईसुंदरी प्रार्थना करत होती
तसेच आम्ही एका खासगी विमानाने येत होतो, अशी माहिती सलमान खानने दिली. "विमानात मी आणि सोहेल खानही होता. मी सोहेलकडे पाहिलं तो झोपला होता. 45 मिनिटे विमान हालत होते. पायलटही हैराण झाला होता. विशेष म्हणजे हवाईसुंदरी देवाची प्रार्थना करत होती. हे सगळं पाहून मी चकित झालो होतो. आतापर्यंत मी हे सगळं फक्त चित्रपटांत पाहिले होते. आता मात्र माझ्यासोबत ते प्रत्यक्ष घडत होतं," असं सलमान खाने सांगितले.
विमानात सोनाक्षी सिन्हाही होती
कालांतराने विमान व्यवस्थित उडत होते. त्यानंतर सर्वांच्या जीवात जीव आला. हा प्रकार घडल्यानंतर सगळेच हासत होते. त्या विमानात सोनाक्षी सिन्हा, सोनाक्षीची आई पूनम सिन्हा यादेखील होत्या, अशी आठवणही सलमान खानने सांगितली.
हेही वाचा :
दिवस-रात्र एक केले, कठोर मेहनत घेतली, छावा चित्रपटासाठी विकी कौशलनं पाहा नेमकं काय केलं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

