Salman Khan On Jawan : लय भारी! भाईजानला आवडला शाहरुखचा 'जवान'; प्रीव्यू शेअर करत म्हणाला,"मी पहिल्याच दिवशी..."
Salman Khan On Jawan Prevue : शाहरुख खानच्या 'जवान'चा प्रीव्यू सलमान आवडला आहे.

Salman Khan On Shah Rukh Khan Jawan Prevue : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. नुकताच 'जवान'चा प्रीव्यू प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'जवान'च्या प्रीव्यूचं सर्वत्र कौतुक होत असून सलमान खानही (Salman Khan) यात मागे पडलेला नाही.
भाईजानने शेअर केला 'जवान'चा प्रीव्यू (Salman Khan Shared Jawan Prevue)
शाहरुख खानच्या 'जवान'चा प्रीव्यू व्हिडीओ सलमानने खानने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत सलमानने लिहिलं आहे,"पठाण' आता 'जवान' झाला आहे. उत्कृष्ट ट्रेलर.. लय भारी झालाय... आवडला.... हा सिनेमा सिनेमागृहात पाहण्यात खरी मजा आहे. मी तर रिलीजच्या पहिल्याच दिवशी पाहणार आहे.. मजा आली वाह...". सलमानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर सलमान खान आणि शाहरुख खान बॉलिवूडचे सुपरस्टार, भाई आता आपल्याला तुझा सिनेमा पाहायचा आहे, दोंनो खान सभी की जान, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
सलमान (Salman Khan) आणि शाहरुख (Shah Rukh Khan) दोघांनाही 1990 च्या दरम्यान इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आहे. दोघांची खूप चांगली मैत्री आहे. 1995 साली 'करण अर्जुन' या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यानंतर एकमेकांच्या सिनेमांत कॅमिओ म्हणून त्यांनी काम केलं.
सलमानच्या 'Tiger 3'मध्ये शाहरुखची झलक
शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमात सलमानची झलक पाहायला मिळाली. दोघांचा फाईट सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता सलमानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमात शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे. या सिनेमात कतरिना कैफदेखील झळकणार आहे. 10 नोव्हेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'जवान' कधी प्रदर्शित होणार? (Jawan Released Date)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण, नयनतारा, विजय सेतुपतीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan : "मैं कौन हूँ, कौन नहीं...नाम तो सुना होगा"; शाहरुखच्या 'जवान'चा अॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
