Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार; जाणून घ्या पाच दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
KKBKKJ : सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा ईदच्या मुहूर्वावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आलं आहे.
'किसी का भाई किसी की जान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection)
सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 15.81 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी, 25.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 26.61 कोटी, चौथ्या दिवशी 10.17 कोटी आणि पाचव्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या सिनेमाने 85.34 कोटींचा गल्ला जमवला आहे. ईदच्या दिवशी आणि वीकेंडला या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. पण तरी सलमान शाहरुखचा रेकॉर्ड ब्रेक करू शकलेला नाही.
- पहिला दिवस : 15.81 कोटी
- दुसरा दिवस : 25.75 कोटी
- तिसरा दिवस : 26.61 कोटी
- चौथा दिवस : 10.17 कोटी
- पाचवा दिवस : 7.50 कोटी
- एकूण कमाई : 85.34 कोटी
'किसी का भाई किसी की जान' 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार
सलमानचे (Salman Khan) चाहते त्याच्या सिनेमाची गेल्या काही वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होते. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. त्याचा हा सिनेमा सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला नसला तरी चाहत्यांना मात्र आवडला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 85.34 कोटींची कमाई केल्याने लवकरच हा सिनेमा 100 कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल.
बजेट 100 कोटींचं...
'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच हा हलका-फुलका सिनेमा प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज करण्यात येणार आहे. 100 कोटींमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कथानकासह सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'किसी का भाई किसी की जान' नंतर सलमानच्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या