एक्स्प्लोर

Salman Khan Firing Case : भाईजानच्या घरावरील गोळीबाराआधी बिश्नोईचे 9 मिनिटाचे भाषण; हल्लेखोरांना म्हणाला, घाबरू नका तुम्ही...

Salman Khan Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी गँगस्टर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांसाठी 9 मिनिटांचे भाषण केले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Salman Khan Firing Case : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी गँगस्टर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांसाठी 9 मिनिटांचे भाषण केले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणातून हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढवले.
  
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. 

अनमोलने दिले 9 मिनिटांचे भाषण

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपासानंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार,  आरोपी अनमोल बिश्नोई याने हल्लेखोर सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक भाषण दिले. आपल्या भाषणात अनमोलने म्हटले की, घाबरू नका, आत्मविश्वासाने तुम्हाला हे काम पूर्ण करायचे आहे. तु्म्ही आपल्या समाजासाठी चांगले काम करत आहात, असे अनमोलने म्हटले. ऑडियो चॅटच्या माध्यमातून अनमोलने हल्लेखोरांना संबोधित केले होते. जवळपास 9 मिनिटाचे हे भाषण आहे. 

अनमोलने भाषणात काय म्हटले?

आपल्या भाषणात अनमोल बिश्नोई याने सांगितले की, तुम्ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात चांगले काम करण्यास जात आहात, हे काम चांगल्या पद्धतीने करा. हे काम पूर्ण होताच, तुम्ही एक इतिहास रचणार आहात. जे काम करण्यास जात आहात, ते धर्माचे काम आहे. त्यामुळे दिलेली जबाबदारी पार पाडताना मनात कोणतीही भीती बाळगू नका असे त्याने म्हटले. त्याने पुढे म्हटले की, हे काम करणे म्हणजे समाजात बदल घडवण्यासारखे आहे. समाज सुधरवणे आणि ज्यांनी चुकीचे काम केलंय त्यांना शिक्षा देण्यासाठी हे काम आपण करत असल्याचे अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणात म्हटले. 

अनमोलने पुढे म्हटले की, बिश्नोई गँगचे एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा कधी आपण असे काम करतो तेव्हा पूर्ण मॅगझीन रिकामी करतो. तुम्हीदेखील सलमान खानच्या घराबाहेर जाऊन पूर्ण मॅगझीन रिकामी करा असे त्याने म्हटले. मात्र, सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक दिसल्याने हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी बाईक न थांबवता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आणि फरार झाले. 

इतर संबंधित बातमी: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Neelam Gorhe Delhi Interview : निलम गोऱ्हे पुन्हा कवितांकडे कशा वळल्या? मराठी शाळेत शिकलेली मुलगी ते विधानपरिषदच्या उपसभापती, संपूर्ण प्रवासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03PM 23 February 2025Neelam Gorhe Full Interview : नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंवर मोठा आरोप, राजकारण ढवळलं | INTERVIEWUddhav Thackeray PC:नीलम गोऱ्हेंनी  राजकारणात चांगभलं केलं,ठाकरेंचं प्रत्युत्तर;भाजपलाही केलं लक्ष्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Embed widget